Nashik News: दहा महिन्यानंतर नाशिक जिल्ह्यातील खासगी क्लासेस पुन्हा सुरू

एमपीसी न्यूज – गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेले नाशिक जिल्ह्यातील खासगी क्लासेस जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतर आजपासून सुरु करण्यात आले. या निर्णयामुळे क्लास संचालकांसह विद्यार्थ्यांकडूनही समाधान व्यक्त केले जात आहे. 

नाशिक जिल्ह्यात शहर व ग्रामीण  मिळून जवळपास अडीच हजार कोचिंग क्लासेस असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या दहा महिन्यांपासून सर्व छोटे, मोठे क्लासेस बंद होते. मात्र यामुळे क्लासच्या जागेचे भाडे, कर्जाचे हप्ते, शिक्षक कर्मचार्‍यांचे पगार, इतर घरगुती व आजारपणाचे खर्च निघत नसल्याने अनेक क्लास चालक आर्थिक अडचणीत सापडले होते.

या सर्व परिस्थितीचा विचार प्रशासनाने करावा तसेच कोरोना रुग्णसंख्येचे प्रमाणही कमी झाल्याने क्लासेस सुरु करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी खासगी कोचिंग क्लास असोसिएशनकडून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे करण्यात आली होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांचे पालन क्लासेस कडून करण्यात येत असून आज पहिलाच दिवस असल्याने क्लासेसला सजावट करण्यात आली असून विद्यार्थ्याचे स्वागत करण्यात आले.

नियमांचे पालन करून क्लासचा ‘श्रीगणेशा’!
 आजपासून स्थानिक प्रशासनाने दिलेल्या परवानगीनुसार आम्ही इ. 11 वी, 12 वी व सी ए फाऊंडेशनचे ऑफलाईन ( Physical ) क्लासेसला सुरुवात केली. सुरुवातीला पालक व विद्यार्थ्यांच्या मनात सुरक्षिततेबाबत काही प्रश्न व शंका होत्या; परंतु आम्ही प्रत्येक विद्यार्थ्याचे ऑक्सीमीटरने ऑक्सिजन तपासणे, टेंम्परेचर गनने शारिरीक तापमान तपासणे, प्रत्येक विद्यार्थासाठी सॅनिटायझरची व्यवस्था, मास्कचा वापर, अनिवार्य वर्गातील गर्दी टाळण्यासाठी तीन दिवस मुली तर तीन दिवस मुले क्लासला येणार अशी व्यवस्था केली आहे. त्यामुळेच पालक विद्यार्थ्यांना स्वखुशीने क्लासला पाठवत आहेत. या ऑफलाईन क्लासेसमुळे विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान आता नक्कीच थांबणार आहे त्यामुळे पालक व विद्यार्थ्यांकडून प्रचंड समाधान व्यक्त केले जात आहे. त्यात इ 10 वी व  12 वी च्या बोर्ड परीक्षा एप्रिल व मे महिन्यात जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांकडून ही प्रशासनाच्या या निर्णयाचे स्वागत होत आहे व पुन्हा एकदा नवीन उत्साहाने विद्यार्थी क्लासला येतील आहेत. सीए सारख्या कोर्ससाठी तर काॅलेजेस नसल्याने त्यास क्लासेस शिवाय पर्यायच नसल्याने सीए फाऊंडेशनचे विद्यार्थी अतिशय आनंदात आहेत. व या नंतर विद्यार्थी व पालकांच्या मागणीनुसार इतर मोठ्या वर्गातील विद्यार्थ्यांचे ही क्लासेस सुरु करण्याचे नियोजन सुरु आहेत.
  – अतुल आचळे (आचलिया) संचालक, अतुल अकौन्टन्सी क्लासेस, नाशिक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.