Nashik News : नाशिकमध्ये चित्ररथाच्या मदतीने होणार साहित्य जागर; दोन हजार पाहुण्यांची खास व्यवस्था

एमपीसीन्यूज : नाशिक येथे होत असलेल्या साहित्य संमेलनाच्या जागृतीसाठी जिल्हाभर एक जागृती चित्ररथ फिरणार असून त्याद्वारे साहित्य जागर करण्यात येणार आहे. तसेच संमेलनासाठी जवळपास 2000 पाहुण्यांची खास व्यवस्था करण्यात येणार असल्याची चर्चा संमेनलस्थळी झाली.

महापौर सतीश कुलकर्णी यांनीही संमेलनस्थळाची पाहणी करत आयोजकांना काही सूचना केल्या.

94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन मार्चच्या शेवटच्या आठवड्यात नाशिकच्या गोखले एज्युकेशन सोसायटीच्या इंजिनिअरिंग कॉलेजच्या आवारात होणार आहे. या पार्श्वभूमीवर नाशिकचे प्रथम नागरिक म्हणून महापौर सतीश कुलकर्णी यांनी संमेलनस्थळाची पाहणी केली.

मुख्य सभामंडपाची जागा, ग्रंथप्रदर्शन, व्हीआयपींच्या विश्रांतीची जागा, विविध सभागृह, भोजनव्यवस्था अशी सर्वच माहिती लोकहितवादी मंडळाचे अध्यक्ष जयप्रकाश जातेगावकर यांनी महापौरांना दिली.

यावेळी नगरसेवक शाहू खैरे, गजानन शेलार, जॉय कांबळे, गुरुमित बग्गा, अण्णा पाटील, विश्वास ठाकूर, संजय करंजकर, शंकर बोऱ्हाडे, देवदत्त जोशी, गिरीश नातू, मुकुंद कुलकर्णी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी खैरे यांनी संमेलनाच्या सर्व कामकाजात महापौरांना म्हणजेच शहरातील लोकप्रतिनिधींना विश्वासात घेण्याच्या सूचना केल्या.

तर शेलार यांनी शहरातील नाशिक रोड, पंचवटी, सातपूर, सिडको या ठिकाणाहून बसव्यवस्थेसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तर बग्गा बौनी नियोजनाच्या दृष्टीने विविध सूचना केल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.