Nashik News : तालुक्यातील सरपंच आरक्षण सोडत जाहीर

एमपीसी न्यूज – नाशिक जिल्ह्यातील 810 ग्रामपंचायतींची सरपंच आरक्षण सोडत आज पार पडत आहे. तहसील कार्यालय स्तरावर या सोडतीची घोषणा केली जात आहे.

नाशिक तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींची सोडतही थोड्या वेळेपूर्वीच जाहीर झाली. यामध्ये एका ग्रामपंचायतीची सोडत रद्द झाली आहे तर इतर 34 ग्रामपंचायतीमध्ये आरक्षण सोडत घोषित करण्यात आले आहे.

यात एकूण 17 ग्रामपंचायतीमध्ये सर्वसाधारण आरक्षण जाहीर झाले आहे. तर नागरिकांच्या मागास वर्गासाठी 8 ग्रामपंचायतींची घोषणा करण्यात आली. उर्वरित सात ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जातीसाठी तीन तर अनुसूचित जमातीसाठी चार ग्रामपंचायतीचे आरक्षण घोषित झाले.

आरक्षण जाहीर झालेल्या ठिकाणी लवकरच सरपंचपदाचा उमेदवार विराजमान होणार आहे. आरक्षण जाहीर होताच सदस्यांकडून फिल्डिंग लावण्याच्या हालचाली सुरु झाल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.