Nashik News : डाॅ. किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करुन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न : चित्रा वाघ

एमपीसीन्यूज : बेहिशोबी मालमत्तेची चौकशी हे प्रकरण न्यायालयात आहे. माझे पती डाॅ. किशोर वाघ यांच्यावर गुन्हा दाखल करुन माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे. मात्र, ही चित्रा वाघ आता शांत बसणार नाही, असा इशारा भाजपच्या महिला मोर्चा पदाधिकारी चित्रा वाघ यांनी सत्ताधाऱ्यांना दिला.

नाशिकमधील वसंतस्मृती येथे आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. पूजा चव्हाण आत्महत्येसाठी संजय राठोड जबाबदार आहेत. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, या मागणीचा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

त्या म्हणाल्या, पूजा चव्हाण आत्महत्येनंतर व्हायरल झालेल्या १२ ऑडीओ क्लिपमधून काय साधण्यात आले. यामध्ये आवाज कुणाचा आहे याचा देखील अद्याप तपास झालेला नाही.

_MPC_DIR_MPU_II

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यावर आपला विश्वास आहे. ते नक्की याबाबत योग्य ती कारवाई करतील. उद्धवजी तुम्ही इतरांसारखे नाहीत तुम्ही दबाव जुगारुन कारवाई कराल, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

गुन्हेगारांना पाठीशीघालून चुकिचा पायंडा घालू नये. पुरावे असूनही सरकार शंडासारखे व नामर्दासारखे वागत असल्याची टीका त्यांनी यावेळी केली.

चित्रा वाघ यांनी धनंजय मुंडे व राठोड या दोघांना सरकार पाठीशी घालत असल्याची टीका केली. 18 दिवस झाले अजुन राठोडांवर गुन्हा दाखल नाही. राठोड यांची मंत्रीमंडळातून हकालपट्टी करावी, अशी मागणी यावेळी त्यांनी केली. माझ्या नवर्‍यावर गुन्हा दाखल झाला हे मला मला मीडियाकडून कळाले, असेही त्या म्हणाल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.