Nashik News : ‘मविप्र’च्या मैदानात होणार विद्रोही साहित्य संमेलन

एमपीसीन्यूज : संविधान सन्मानार्थ आयोजित करण्यात येणारे यंदाचे  15 वे विद्रोही साहित्य संमेलन छत्रपती शाहू महाराज व सत्यशोधक चळवळीचा वारसा असलेल्या ‘मविप्र’च्या मैदानात होणार आहे. यासाठी संस्थेच्या वतीने मान्यता देण्यात आली आहे.

विद्रोही साहित्य संमेलनाचे मुख्य विश्वस्त ॲड. मनीष बस्ते यांच्या नेतृत्वाखाली दि. 12  फेब्रुवारी 2021 रोजी मविप्र संस्थेस संमेलनासाठी मविप्रचे मैदान उपलब्ध करुन देण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. त्यास ‘मविप्र’ने मान्यता दिली आहे.

तसेच कोरोना महामारी संदर्भातील शासकीय धोरण व नियम पाळण्याच्या अटीसह ही मान्यता देण्यात येत असल्याचे पत्र संस्थेने दिले आहे.

आज गुरुवारी (दि. 25) मविप्र संस्थेचे शिक्षण अधिकारी प्रा. एस. के. शिंदे यांनी संमेलनाचे स्वागताध्यक्ष शशी उन्हवणे, मुख्य संयोजक राजू देसले, राज्य संघटक किशोर ढमाले, स्वागत समितीचे राज निकाळे, प्रभाकर धात्रक, व्ही. टी. जाधव यांच्याकडे सुपूर्द केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.