Nashik : ऐतिहासिक काळाराम मंदिरातील भगवान श्रीरामाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी घेतले दर्शन

एमपीसी न्यूज – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी (Nashik) आज नाशिक येथील ऐतिहासिक श्री काळाराम मंदिरात जावून श्रीरामाचे दर्शन घेतले. यावेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात विधीवत पूजा व आरती करण्यात आली. यावेळी काळाराम मंदिर संस्थानचे मुख्य महंत व विश्वस्त यांच्यातर्फे प्रधानमंत्री मोदी यांना श्रीरामाची चांदीची प्रतिमा, शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.

काळाराम मंदिराचे मुख्य महंत आचार्य महामंडलेश्वर सुधीरदास महाराज, काळाराम मंदिर संस्थानचे विश्वस्त धनंजय पुजारी, मंगेश पुजारी, नरेश पुजारी, मंदार जानोरकर, एकनाथ कुलकर्णी, पं. प्रणव पुजारी, अद्वय पुजारी तसेच वारकरी आणि संत परिवारातील मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या समोर अभंग आणि भावार्थ रामायणातील 8 व्या अध्यायाचे (श्लोकांचे) ज्यामध्ये प्रभू श्रीराम यांचा नाशिकमधील वास्तव्याचा उल्लेख आहे, त्याचे वाचन करण्यात आले. यावेळी मंदिर परिसरात उपस्थित महंत, वारकरी आणि संत कुटुंबातील वंशज यांच्याशी प्रधानमंत्री महोदयांनी संवाद साधला.

Pune : जखमी पक्ष्यांच्या बचावकार्यासाठी हेल्पलाईन सुरु; चीनी मांजाची छुपी विक्री थांबवण्यासाठी कठोर पावले उचलावीत

स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास प्रधानमंत्री मोदी यांचे अभिवादन

मंदिर परिसरात असलेल्या स्वामी विवेकानंद यांच्या पुतळ्यास (Nashik) प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली गंगापूजनसह महाआरती

दक्षिणेची गंगा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोदावरी नदीची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज गंगापूजन करून रामतीर्थ येथे दर्शन घेत विधीवत पूजा व आरती केली. भारत विश्वगुरू होऊ दे, असा संकल्प त्यांनी यावेळी केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.