Pimpri : राष्ट्रवादीच्या माई काटे यांचा महापौरपदासाठी अर्ज; राजू बनसोडे यांचा उपमहापौरपदासाठी अर्ज

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेत विरोधात असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने देखील महापौरपदासाठी माई काटे तर उपमहापौरपदासाठी राजू बनसोडे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, नगरसेवक भाऊसाहेब भोईर, मयुर कलाटे, प्रशांत शितोळे, नगरसेविका वैशाली काळभोर, सुलक्षणा धर उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात आहे. राष्ट्रवादीचे केवळ 36 नगरसेवक आहेत. भाजपमधील नाराज नगरसेवकांवरच राष्ट्रवादीला चमत्कार होण्याची अपेक्षा आहे.

..असे आहे पक्षीय बलाबल!

पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपची निविर्विदा सत्ता आहे.  त्यामुळे भाजपचा महापौर होणार हे निश्चित आहे. भाजपचे तब्बल 77 नगरसेवक आहेत. तर, राष्ट्रवादी काँग्रेसचे 36, शिवसेना 9, मनसे 1 आणि अपक्ष 5 असे 128 नगरसेवक आहेत. अपक्ष नगरसेवक भाजपशी सलंग्न आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.