Vadgaon Maval : गोवित्री विविध कार्यकारी सेवा विकास सोसायटीच्या अध्यक्षपदी नथू गुरव यांची निवड

तर उपाध्यक्षपदी बबन श्रीपती गायकवाड

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ येथील गोवित्री विविध कार्यकारी सेवा विकास सोसायटीच्या संचालक मंडळाच्या बैठकीत अध्यक्षपदी नथू मारुती गुरव तर उपाध्यक्षपदी बबन श्रीपती गायकवाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक व्ही पी कोतकर यांनी काम पाहिले.

वडगाव मावळ येथील निबंधक कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये सदर निर्णय घेण्यात आला. यावेळी संचालक ज्ञानोबा पवार, तुकाराम शेडगे, भाऊ सुतार, मधुकर जाधव, पार्वती पवार, रघुनाथ भुरुक, शंकर ठाकर हे संचालक उपस्थित होते.

निवडीनंतर झालेल्या सभेत संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक गणपतराव शेडगे, सरसेनापती उमाबाई दाभाडे पतसंस्थेचे चेअरमन बजरंग जाधव, संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक बाळासाहेब गायकवाड, आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी स्वागत गणपतराव शेडगे यांनी केलं.  अभिनंदन बजरंग जाधव यांनी केले. तर आभार सचिव बापू ढोरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.