Pimpri : नेशन बिल्डर पुरस्कार वितरण सोहळा उत्साहात; 76 शिक्षकांचा गौरव

इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडचा उपक्रम

एमपीसी न्यूज – इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडतर्फे शहरातील 76 शिक्षकांना नेशन बिल्डर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. आदर्श समाजाच्या निर्मितीसाठी उत्तम शिक्षक निर्माण होणे आवश्यक आहे.त्यामुळे चांगल्या शिक्षकांचा सन्मान करून शिक्षकरत्न जपणे गरजेचे आहे. शिक्षण हे इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडचे मुख्य ध्येय आहे. त्यामध्ये विविध शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. 

निगडीमधील ज्ञान प्रबोधिनी विद्यालयात झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पीडीसी राज नहार, इनरव्हील क्लब ऑफ निगडी प्राईडच्या अध्यक्षा अॅड. प्रतिभा जोशी दलाल, रेखा मित्रगोत्री,मुक्ती पानसे, आरती मुळे, सविता राजापूरकर, जयश्री कुलकर्णी, शकुंतला बन्सल, रेणू मित्रा, साधना काळभोर, नेहा देशमुख, रंजना कदम, स्मिता ईळवे, सुजाता ढमाले, वैशाली देवतळे, प्रतिमा देशमुखे, निर्मल कौर,कमलजित दुल्लत, अर्जुन दलाल, हरबिंदरसिंग दुल्लत आदी उपस्थित होते.

राज नहार म्हणाले, “आजचे तरुण उद्याच्या भारताचे भविष्य आहेत. हे भविष्य भक्कम करण्यासाठी आजचा विद्यार्थी सक्षम आणि आदर्श करणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांच्या जडण घडणीमध्ये शिक्षकाची भूमिकाअतिशय महत्वाची आहे. एक आदर्श शिक्षक शेकडो आदर्श नागरिक घडवू शकतो. त्यामुळे शिक्षकांची ताकद असामान्य आहे. त्यांच्या ताकदीचा गौरव करणे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. इनरव्हील क्लब ऑफनिगडी प्राईडतर्फे देण्यात आलेले पुरस्कार सर्व शिक्षकांमध्ये आदर्श शिक्षक तयार करण्याची नवी चेतना निर्माण करतील.”

पुरस्कार प्राप्त सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना पुरस्कारासह लीगल लिटरसी बुक देण्यात आले. या पुस्तकाचे लेखन अध्यक्षा अॅड. प्रतिभा जोशी दलाल यांनी केले आहे. पुस्तकामध्ये महिलांचे अधिकार आणि त्यांच्यासुरक्षेविषयी असणारे कायदे, मुलांच्या सुरक्षेविषयीचे कायदे यांची माहिती देण्यात आली आहे. ब-याच वेळेला कामाच्या ठिकाणी महिलांवर अतिप्रसंग, बळजबरी, त्यांच्या अधिकारांचे हनन यांसारख्या घटना घडतात.परंतु कायद्याची माहिती नसल्याने महिला तो अन्याय बळजबरीने सहन करतात. अशा महिलांना त्यांच्या अधिकारांची आणि कायदयाच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी लीगल लिटरसी बुक तयार करण्यातआले असल्याची माहिती अॅड. प्रतिभा जोशी दलाल यांनी दिली.

इनरव्हील क्लब ऑफ निगडीतर्फे शिक्षण या विभागामध्ये पाच हैप्पी स्कूल, पाच प्रौढ साक्षरता वर्ग, पाच आशा किरण आणि पाच ई-लर्निंग केंद्र उभारणीचे नियोजन सुरु आहे. याबाबतची उद्घोषणा पुरस्कार वितरणसोहळ्यात करण्यात आली. सूत्रसंचालन कमलजीत दुल्लत यांनी केले. आभार रेखा मित्रगोत्री यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.