Lonavala : सिंहगड पब्लिक स्कूलला राष्ट्रीय पारितोषिक

एमपीसी न्यूज – भारतातील प्रतिष्ठित स्कूल जुरी अवॉर्ड फॉर 2019 हा सन्मान यावर्षी लोणावळ्याजवळील सिंहगड पब्लिक स्कूलला (महाराष्ट्र विभागातील) प्राप्त झाला आहे.   

सिंहगड पब्लिक स्कूलने 1000 पैकी 805 गुण मिळवून महाराष्ट्रातील टॉप डे – कम बोर्डिंग स्कूलचा प्रथम क्रमांक मिळवून सन्मान प्राप्त केला आहे. सिंहगड पब्लिक स्कूलची स्थापना सिंहगड संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. एम एन नवले यांची व संस्थापक सचिव डॉ सुनंदा नवले यांचे मार्गदर्शन यातून 2014 साली झाली आहे.

शिस्तबद्ध व उच्च दर्जाचे शिक्षण देण्यामध्ये या स्कूलने नावलौकिक अल्पावधीत प्राप्त केला आहे. नुकताच एज्युकेशन टुडे यांच्या वतीने मुंबईत आयोजित सोहळ्यात हा पुरस्कार स्कूलचे प्राचार्य निर्मलकुमार मिश्रा यांनी स्वीकारला. स्कूलच्या या यशाबद्दल सिंहगड लोणावळा संकुलातील सर्व प्राचार्य व संकुल संचालक मा. डॉ. एम. एस. गायकवाड यांनी प्राचार्य मिश्रा यांचे व सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.