National Film Awards : सुशांत सिंग राजपूत अभिनित ‘छिछोरे’ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट पुरस्कार

एमपीसी न्यूज – 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. 2019 मधील चित्रपट आणि कलाकारांसाठी या पुरस्काराची घोषणा केली. यामध्ये सुशांत सिंग राजपूतने अभिनय केलेल्या ‘छिछोरे’ या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

तसेच, अभिनेत्री कंगना राणावत, अभिनेता मनोज वाजपेयी व अभिनेता धनुष यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

अभिनेत्री कंगना राणावत हिला ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी व ‘पंगा’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा, अभिनेता मनोज वाजपेयी याला ‘भोसले’ चित्रपटासाठी तर, धनुषच्या ‘असुरन’ या तमिळ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला आहे.

67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा गेल्या वर्षी मे महिन्यात होणार होती पण कोरोनामुळे हे लांबणीवर पडले होते. सिक्कीम राज्याला चित्रिकरणासाठी सर्वात पसंतीचे राज्य म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. सोहिनी चटोपाध्याय यांना सर्वोत्कृष्ट चित्रपट समीक्षक म्हणून पुरस्कार जाहीर झाला आहे. सूचना आणि प्रसारण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या डायरेक्टोरेट ऑफ फिल्म फेस्टिवल यांच्यामार्फत हा पुरस्कार दिला जातो.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.