Pune : राष्ट्रीय सॅम्बो अजिंक्यपद स्पर्धा मंगळवारपासून

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र सॅम्बो असोसिएशन आणि सॅम्बो फेडरेशन ऑफ  इंडियाच्या वतीने  १० व्या राष्ट्रीय सॅम्बो अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवार (दि. १८) ते गुरुवार (दि.२०) फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात  पार पडणार आहे.

१० व्या राष्ट्रीय सॅम्बो अजिंक्यपद स्पर्धेत या वर्षी २५ राज्यातून ३०० पेक्ष्या जास्त स्पर्धकांनी सहभाग नोंदवला असून मंगळवार (दि. १८) ते गुरुवार (दि.२०) फेब्रुवारी दरम्यान ही स्पर्धा म्हाळुंगे, बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात पार पडणार आहे.  महाराष्ट्र सॅम्बो असोसिएशन आणि सॅम्बो फेडरेशन ऑफ  इंडियाच्या वतीने या स्पर्धेचे आयोजन दरवर्षी करण्यात येते.
यामध्ये ज्युनिअर, सिनीअर, युथ  आणि मास्टर गटात मुले आणि मुलींच्या स्पर्धा होणार आहेत.  युथ गटात ४० ते ८७ पेक्षा अधिक वजनी गटात स्पर्धा होणार आहेत. ज्युनिअर गटात ४४ ते १०० पेक्षा अधिक वजनी गटात तर सिनीअरमध्ये ५२ ते १०० पेक्षा अधिक आणि मास्टर मध्ये ६२ ते १०० पेक्षा अधिक वजनी गटात स्पर्धा होणार आहेत.

स्पर्धेच्या अंतिम लढती आणि पारितोषिक वितरण समारंभ २० फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती सॅम्बो फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव दिप्तीराम शर्मा आणि महाराष्ट्र सॅम्बो असोसिएशनचे सचिव अनुप नाईक यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.