Pune : अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालयात राष्ट्रीय विज्ञान दिवस उत्साहात

एमपीसी न्यूज – अँग्लो उर्दू बॉईज हायस्कूल व कनिष्ठ महाविदयालय येथे आज (शुक्रवारी) राष्ट्रीय विज्ञान दिवस मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विदयार्थ्यांच्या सहभागातून साकारलेले विज्ञान प्रदर्शन व विविध व्याख्यानांचे आयोजन करण्यात आले होते.

राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधून सध्या जगात धुमाकूळ घालत असलेल्या कोरोना या विषाणूबद्दल व उपयुक्त उपाययोजना याविषयी विद्यार्थ्यामध्ये जनजागृती करण्यात आली. तसेच रूबी हॉल क्लिनिक येथील रिसर्च कोऑर्डीनेटर डॅा. आयशा शेख यांनी मुलांना मार्गदर्शन केले.

प्राचार्या परवीन शेख यांनी कार्यकमाचे प्रास्ताविक करत विद्यालयात सुरू असलेल्या विविध उपक्रमांची माहिती उपस्थितांना करून दिली. या कार्यक्रमासाठी प्रशालेतील विज्ञान शिक्षक रिझवाना पटेल, लमिसा सैय्यद, शमशाद शेख, राज मुजावर , मुनाफ पागान यांनी परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.