Talegaon : नवलाख उंब्रे गावात राष्ट्रीय सेवा योजना शिबिर

पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालयाच्या वतीने आयोजन

एमपीसी न्यूज – महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न डॉ. डी वाय पाटील एज्युकेशन अकॅडमी मुंबई संचलित पद्मभूषण वसंतदादा पाटील कृषी महाविद्यालय, आंबी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय सेवा योजना शिबिराला उत्साहात सुरुवात झाली. राष्ट्रीय सेवा योजना स्वच्छ आणि स्वस्थ भारत अभियान विशेष श्रमसंस्कार शिबीर शनिवार (दि. 26) ते शुक्रवार (दि. 1) या कालावधीत मावळ तालुक्यातील नवलाख उंब्रे येथे होणार आहे.

शनिवारी शिबिराचे उदघाटन झाले. उदघाटनप्रसंगी मावळ तालुक्याचे माजी सभापती निवृत्ती शेटे, सरपंच दत्तात्रय पडवळ, उपसरपंच ज्योती बधाले, पोलीस उपनिरीक्षक कोळी, पोलीस पाटील सुभाष पापळ, कार्यकारी अधिकारी प्रा. सुधीर शिंदे, मुख्यध्यापक विजय चव्हाण, शालेय समिती अध्यक्ष राजू पडवळ, प्रभारी प्राचार्य प्रा. बी. व्ही. खोब्रागडे आणि स्वयंसेवक आदी उपस्थित होते.

सात दिवसांच्या शिबिरामध्ये विद्यार्थी स्वच्छता आणि जनजागृतीचे विविध उपक्रम राबविणार आहेत. घरोघरी जाऊन स्वच्छतेचा मंत्र देणार आहेत. तसेच स्वतः स्वच्छतेत सक्रिय सहभाग नोंदवून त्याचे महत्व पटवून देणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.