Bhosari News : राजमाता महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा

एमपीसी न्यूज – 207- भोसरी विधानसभा मतदारसंघ व राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळाचे, कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय लांडेवाडी, भोसरी यांच्या (Bhosari News) संयुक्त विद्यमाने  25 जानेवारी 2023 रोजी 13 वा राष्ट्रीय मतदार दिनउत्साहात साजरा करण्यात आला.

25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली असून आयोगाचा हा स्थापना दिवस 2011 पासून संपूर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन म्हणून साजरा केला जातो. नवमतदारांचे नाव नोंदवणे, त्यांना प्रोत्साहन देणे या उद्देशाने हा दिन साजरा केला जातो.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रभारी उपजिल्हाधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी भाऊ गलांडे  हे उपस्थित होते. तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे विश्वस्त विक्रांत लांडे स होते. कार्यक्रमाच्या प्रारंभास उपस्थित सर्व मान्यवरांचा महाविद्यालयाच्या वतीने स्वागत-सत्कार करण्यात आले.(Bhosari News) त्यानंतर मतदारांसाठी सार्वत्रिक प्रतिज्ञा घेण्यात आली. सदर कार्यक्रमांमध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाने केलेल्या कामगिरीबद्दल कौतुक केले. तसेच मतदानाचा अधिकार अमूल्य असल्याचे मत व्यक्त केले.

यावेळी मतदान जनजागृती विषयी भाऊ गलांडे आणि अण्णा बोदडे यांनी  विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.यावेळी मतदार नोंदणी अभियानामध्ये उत्कृष्ठ कामगिरी केल्याबद्दल राजमाता जिजाऊ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक पाटील  व इतर 4 महाविद्यालयातील प्राचार्य, BLo व पर्यवेक्षक यांना प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

Talegaon Dabhade : इंद्रायणी महाविद्यालयात राष्ट्रीय मतदार दिन संपन्न! 

राजमाता महाविद्यालयामध्ये मा.जिल्हाधिकारी पुणे यांचे निर्देशनवे आयोजित(Mega Camp) मध्ये एकूण 1189 नवीन नवंमतदार नोंदणी करण्यात आली. तसेच मतदार दिनाचे औचित्य साधून महाविद्यालयात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेमध्ये विजेते विद्यार्थ्यांना देखील  प्रशस्तीपत्र  देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

डुडुळगाव येथील शरदचंद्र पवार महाविद्यालय, प्राचार्य डॉ. हंसराज थोरात, चिखलीतील शिक्षण महर्षी डॉ. डी. वाय. पाटील सेंटर फॉर मॅनेजमेंट अँड रिसर्चचे प्राचार्य डॉ. सुनील धनवटे,सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी पांडुरंग पवार, सीताराम बहुरे,  शुभदा पंडित, सुनिल कास्टेवाड, राजमाता (Bhosari News) जिजाऊ महाविद्यालयाचे उपप्राचार्य किरण चौधरी, प्रबंधिका अश्विनी भोसले-चव्हाण,जुनियर महाविद्यालयाच्या  प्रचार्या  डॉ. नेहा बोरसे, रात्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. श्रेया दाणी,  प्राध्यापक आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित तसेच.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. सुग्रीव अडाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. रेश्मा लोहकरे यांनी मानले. विद्यार्थ्यांना अल्पोहार देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.