Pune : राष्ट्रवादी काँग्रेसने राम कदम यांच्या प्रतिमेला फासले काळे 

एमपीसी न्यूज : भाजप आमदार राम कदम यांनी मुलींबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याच्या विरोधात राज्यभर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. पुण्यात आज, (बुधवारी)  राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात आले.रावण कदम हाय हाय अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आंदोलकांनी राम कदम यांच्या प्रतिमेला जोडे मारत काळ फासले. 

_MPC_DIR_MPU_II

पुरोगामी महाराष्ट्रात अस बेताल वक्तव्य करणं ही शरमेच बाब आहे. एकीकडे पक्ष रामाचे नाव घेते आणि पक्षात सगळे रावण भरलेत . राम कदम सारख्या नीच माणसाने देशातील समस्त महिलांची माफी मगितलीच पाहिजे अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन तुपे यांनी केली आहे.

दरम्यान, घाटकोपर येथे दहीहंडीच्या कार्यक्रमात भाजपचे आमदार राम कदम यांनी मुलीची परवानगी नसेल तरी तिला पळवून नेण्याचे आक्षेपार्ह विधान केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1