Pimpri : राष्ट्रवादीने घातले नोटाबंदी निर्णयाचे श्राद्ध

एमपीसी न्यूज – भाजप सरकारच्या नोटबंदीच्या निर्णयाचे राष्ट्रवादी युवक काँग्रेसने आज (शुक्रवारी) श्राद्ध घातले आहे. नोटबंदीला दोन वर्षपूर्ण झाल्यानिमित्त हे आंदोलन करण्यात आले आहे.

पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात झालेल्या आंदोलात राष्ट्रवादी युवकचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, पक्ष प्रवक्ते फजल शेख, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस विशाल काळभोर, सरचिटणीस प्रतिक साळुंके, उपाध्यक्ष निखिल दळवी, शादाब खान, आक्षय माचरे, सचिन मोकाशी, दिनेश पटेल, रामदास करंजकर, वेदांत माळी, मंगेश बजबळकर, रमणदीपसिंग कोहली, सरॅफराज शेख, यतिन पारेख, पोपट पडवळ, सर्जेराव जगताप यांच्यासह कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

केंद्र सरकारने नोटाबंदीचा निर्णय घेतल्यानंतर निर्माण झालेल्या अभूतपूर्व संकटामुळे कष्टकरी शेतकरी, कामगार वर्ग आणि छोटे व्यावसायिक या घटकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागले आहे. सरकारच्या या नियोजनशून्य कारभाराचा व अपयशी निर्णयाचा निषेध करण्यासाठी नोटबंदी निर्णयाचे श्राद्ध आंदोलन करण्यात आल्याचे राष्ट्रवादीने सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
HB_POST_END_FTR-A2
You might also like