Pune : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीची संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू

एमपीसी न्यूज – आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संघटनात्मक पातळीवर तयारी सुरू केली आहे. आघाडीमध्ये शहरातील कुठलेही विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आले तरी सर्वच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीनिशी उतरणार असल्याचे पक्षाचे शहरअध्यक्ष चेतन तुपे आणि खासदार वंदना चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

तुपे आणि चव्हाण म्हणाल्या, की पक्ष संघटनात्मक बांधणीसाठी आज दिवसभर राष्ट्रवादी काँग्रेसचे लोकप्रतिनिधी, विविध सेलचे अध्यक्ष आणि पदाधिकार्‍यांच्या बैठका घेण्यात आल्या. पक्षाची बूथ लेव्हल पर्यंतची बांधणी पूर्ण झाली असून बूथ लेव्हलच्या कामांना गती देण्यासाठी कार्यक्रम आखण्यात आले आहेत. युवती काँग्रेसच्यावतीने अगदी महाविद्यालयीन स्तरावर विद्यार्थ्यांमध्ये मासिक पाळीसंदर्भात जनजागृती करण्यात येत आहे. युवक आणि विद्यार्थी काँग्रेसच्यावतीने रोजगार तसेच शासनाच्या विविध योजनांबाबत जनजागृती करण्यात येत आहे. प्रसंगी रोजगारासंदर्भात आंदोलनेही करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. शहरातील कचरा समस्येबाबत नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी उपक्रम हाती घेण्यात आले आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.