Chinchwad : किल्ले भाड्याने देण्याच्या कथित निर्णयाविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे आंदोलन

एमपीसी न्यूज – भाजप सरकारने घेतलेल्या कथित नवीन निर्णयानुसार महाराष्ट्रातील 25 गड किल्ले लग्न आणि इतर सोहळ्यासाठी भाडयाने देण्यात येणार आहे. या निर्णयाला विरोध करण्यासाठी राष्ट्रवादी युवक काँग्रेसने चिंचवड डांगे चौकातील छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ आंदोलन केले. भाजप सरकारचा निषेध करण्यात आला.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहर अध्यक्ष विशाल वाकडकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, विरोधी पक्षनेते नाना काटे, माजी स्थायी समिती सभापती प्रशांत शितोळे, रविकांत वरपे, कार्याध्यक्ष डॉ शैलेश मोहिते उपस्थित होते.

_MPC_DIR_MPU_II

शासनाने हा कथित निर्णय लवकरात लवकर मागे घेऊन सबंध महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा भाजपच्या कुठल्याही मंत्र्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी युवक काँग्रेसने दिला.

या निर्णयाच्या विरोधात व हा घेतलेला निर्णय तात्काळ मागे घेण्यासाठी पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व पुरोगामी व समविचारी पक्ष -सामाजिक संघटना यांच्या वतीने पिंपरी येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मानव कांबळे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

आंदोलनात सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रकाश जाधव, पिंपरी-चिंचवड शहर काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन साठे, मनसेचे सचिन चिखले, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक जीवन बोराडे, समाजवादी पार्टीचे रफिक कुरेशी, लोकजनशक्ती पार्टीचे धुराजी शिंदे, शेकापचे नाना फुगे, आपचे प्रकाश पठारे, एमआयएमचे धम्मराज साळवे, राष्ट्रवादीचे विशाल जाधव, वंचित बहुजन आघाडीचे सुरेश गायकवाड, छावा संघटनेचे धनाजी येळकर, संभाजी ब्रिगेडचे विशाल तुळवे, अपना वतनचे सिद्दीक शेख व नागरी हक्क सुरक्षा समितीचे गिरीश वाघमारे यांनी निषेधपर मनोगत व्यक्त केले. यावेळी सतिश काळे, राजेंद्र देवकर,सागर तापकीर,नीरज कडू,लहुजी लांडगे, रशिद सय्यद,सतिश कदम, गिरीधर लढढा,दिलीप काकडे,छाया देसले, आश्विनी बांगर,रूहिना शेख उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.