Pune News : दंडेलशाही करणा-या फायनान्स कंपन्याना आळा घाला, राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी

एमपीसी न्यूज – कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर कर्ज घेतलेल्या अनेकांचे हफ्ते थकले आहेत. कर्जवसुलीसाठी फायनान्स कंपन्या दंडेलशाही करत आहेत. ही दंडेलशाही थांबवावी, अशी मागणी पुणे शहर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन राष्ट्रवादी युवक काँग्रेस पुणे शहरचे सरचिटणीस गिरीश गुरनानी यांनी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांना दिले.

‘कोरोना आणि लॉकडाऊन यामुळे अनेकजण बेरोजगार झाले. बरेचसे व्यावसायिक संकटात सापडले, तर काहींचा व्यवसाय बंद पडला. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या अनेकांना  कर्जाचे हफ्ते देणे शक्य होत नाही. पण, फायनान्स कंपन्या या कर्जवसुलीसाठी बळजबरी करत आहेत. कर्जदारांच्या कुटुंबियांना धमकावणे व त्यांच्याबरोबर गैरवर्तन करत आहेत. अशा मुजोर कर्जवसुली करणाऱ्या फायनान्स कंपन्यांना आळा घालावा,’ असे गुरूनानी यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

‘कर्जदारांना थकीत हप्ते भरण्यासाठी काही कालावधी द्यावा. कर्जदारांची कोणतीही मालमत्ता पूर्व कल्पना न देता ताब्यात घेऊ नये.’ या प्रकरणी अमिताभ गुप्ता यांनी लक्ष घाण्याची विनंती निवेदनात केली आहे.

या वेळी प्रितम पायगुडे, ऋषिकेश कडू, सौरभ ससाणे, धनंजय शेळके, अमोल गायकवाड, अक्षय नागरे, रवी गाडे उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.