Natu Natu Oscars 2023: ऑस्कर जिंकण्यासाठी ‘RRR’ सज्ज

एमपीसी न्यूज : बहुचर्चित अशा ऑस्कर 2023 च्या (Natu Natu Oscars 2023) नामांकनांची घोषणा आज करण्यात आली. 95 व्या अकादमी पुरस्कारांसाठी ‘आरआरआर’ चित्रपटामधील ‘नाटू नाटू’ हे गाणं आता बेस्ट ओरिजनल सॉंग या कॅटेगरीमध्ये शॉर्टलिस्ट करण्यात आली आहे. तर ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या शॉर्टफिल्मला डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्म या कॅटेगरीत नामांकन मिळाले आहे.

Chinchwad Bye Election: राजकीय पक्षांचे फ्लेक्‍स तत्काळ काढा; उपजिल्हाधिका-यांचे महापालिकेला पत्र

भारतीय चित्रपटसृष्टीसाठी आजचा दिवस खूप आनंदाचा आहे कारण एसएस राजामौली यांच्या RRR चित्रपटातील ‘नाटू नाटू’ या गाण्याला 95 व्या ऑस्कर पुरस्कारांच्या अंतिम नामांकनात स्थान मिळाले आहे. आता ऑस्कर जिंकण्याच्या भारताच्या आशा वाढल्या आहेत. याशिवाय दोन डॉक्युमेंटरी फिल्मही जिंकल्या आहेत. गुजराती चित्रपट ‘चेल्लो शो’ (द लास्ट फिल्म शो) ला देशातून अधिकृत एंट्री पाठवण्यात आली होती, परंतु हा चित्रपट ऑस्कर जिंकण्याच्या शर्यतीतून बाहेर पडला आहे.

ऑस्करच्या अंतिम नामांकनात स्थान मिळवल्यानंतर, (Natu Natu Oscars 2023) आरआरआर चित्रपटाच्या टीमने एक ट्विट केले आहे, ज्यामध्ये त्यांचा आनंद स्पष्टपणे दिसत आहे. ट्विटमध्ये लिहिले आहे, ‘आम्ही इतिहास घडवला आहे!!! #NaatuNaatu ला 95 व्या अकादमी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट मूळ गाण्यासाठी नामांकन मिळाले आहे हे सांगताना अभिमान वाटतो आणि विशेषाधिकार वाटतो. #ऑस्कर #RRRMovie

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.