Pimpri : एक हाक मानवतेची नैसर्गिक  पर्यावरण संवर्धन संस्थेचा उपक्रम 

एमपीसी न्यूज –   नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या वतीने पुण्यापासून जवळपास 50 किमी अंतरावर डोंगर दऱ्यांच्या कुशीत असलेल्या दुर्गम अशा खेड तालुक्‍यातील कोहिंडे, आंबोली या गावांमध्ये दिवाळी निमित्ताने एक हाक मानवतेची हा उपक्रम राबविण्यात आला.

या उपक्रमांतर्गत गरीब आदिवासी बांधवांना कपडे व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. यावेळी आदिवासी बांधव भारावून गेले होते. या प्रसंगी शिवे गावचे पोलीस पाटील ज्ञानेश्वर साळुंके, संस्थेचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष दीपक भवर, पश्‍चिम महाराष्ट्र सचिव तुषार दळवी, उपक्रमाचे संयोजक तथा पुणे जिल्हा उपाध्यक्ष आकाश भोकसे, मावळ तालुका अध्यक्ष अभय केवट, खेड तालुका अध्यक्ष कुलदीप गरुड, आकाश सातपुते, ऋषिकेश शिवेकर आदी संस्थेचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ या उपक्रमाला उपस्थित होते. यावेळी सूत्रसंचालन चिंतामण शिवेकर यांनी केले. स्वागत जयसिंग मोहन यांनी केले तर आभार पोलीस पाटील सुभाष मोहन यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.