Thergaon : नवरात्रीमध्ये विचारांचा जागर होणे गरजेचे – सविता इंगळे

एमपीसी न्यूज – नवरात्रामध्ये नवशक्तींची पूजा केली जाते. स्त्री शक्तीचा जागर केला जातो. तिच्यामधे असलेल्या अदभुत शक्तींचा जागर केला जातो. असे असले तरी आजही स्त्रियांवर अत्याचार होत आहेत. म्हणून स्ञीने आपल्यामधे असलेल्या सुप्त शक्तीला ओळखून त्या शक्तींना जागृत केले पाहिजे आणि तिने ख-या अर्थाने दुर्गा व्हायला पाहिजे. असे प्रतिपादन स्वयंसिद्धा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सविता इंगळे यांनी केले.

स्वयंसिद्धा प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड शहरतर्फे खिवंसरा पाटील विद्यालय, थेरगाव येथे ‘जागर स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सविता इंगळे बोलत होत्या. यावेळी या प्रतिष्ठानचे उपाध्यक्ष नंदकुमार मुरडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते सुभाष चव्हाण, शाळेचे मुख्याध्यापक नटराज जगताप, मल्लिकार्जुन इंगळे, मानसी चिटणीस, प्राजक्ता रुद्रावर, अंजली सुमंत, पुष्पा जाधव उपस्थित होते.

नंदकुमार मुरडे म्हणाले की, मुलींनी उच्च स्थान प्राप्त करून त्या ठिकाणी अटल राहण्यासाठी शील जपावं, वाणी जपावी आणि ज्ञानार्जन करावं, देश तुमच्यामुळेच घडणार आहे, अनंत संधी आहेत, प्रयत्नशील राहा असे त्यांनी सांगितले.

यावेळी स्वयंसिद्धा प्रतिष्ठानकडून शाळेतील 10 विद्यार्थिनींना कराटे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुलींसाठी भोंडला कार्यक्रमाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते. प्रास्ताविक वनिता जोरी यांनी केले सूत्रसंचालन त्रिवेणी खामकर तर आभार सुनीता घोडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.