Navdhara : सरकारचे शैक्षणिक धोरण हे संशोधन उपक्रमांना चालना देणारे : डॉ. मनोहर चासकर

एमपीसी न्यूज  केंद्र सरकारचे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण हे “नवधारा” (Navdhara) सारख्या संशोधन उपक्रमांना चालना व  पाठबळ देणारे आहे. त्यामुळे आगामी काळात अशा उपक्रमांना विद्यापीठ नेहमी पाठबळ देईल, अशी ग्वाही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे सायन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाचे अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर यांनी दिली.

पीसीसीओईआर मध्ये नवधारा (Navdhara) या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. याच स्पर्धेचे शनिवारी (दि.1) बक्षीस वितरण करण्यात आले होते. यावेळी डॉ. चासकर बोलत होते. यावेळी कॅप जेमिनी इंडियाचे संचालक गिरीश बोराउद्योजक नरेंद्र लांडगेपीसीसीओईआरचे प्राचार्य डॉ. हरीश तिवारीपीसीईटीच्या डॉ. जान्हवी इनामदारट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिष्ठाता डॉ. शीतलकुमार रवंदळेप्रा. तुषार गायकवाडप्रा. मनीषा देशपांडेप्रा. प्रिया ओघे आदी उपस्थित होते.

पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय आणि संशोधन केंद्र (पीसीसीओईआर) येथे  “नवोधारा 2022” (Navdhara) या राज्यस्तरीय प्रकल्प व पोस्टर्स स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेत कोल्हापूरसोलापूरसातारासांगलीशिरपूर मुंबईसंगमनेररत्नागिरी आदी जिल्ह्यातून मेकॅनिकलसिव्हीलकॉम्प्युटरइलेक्ट्रॉनिक्स अँड टेली कम्युनिकेशन या शाखांमधील प्रोजेक्ट आणि पोस्टर्स घेऊन संघ सहभागी झाले आहेत. विजेत्या संघांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगेउपाध्यक्षा पद्माताई भोसलेसचिव विठ्ठल काळभोरखजिनदार शांताराम गराडेविश्वस्त हर्षवर्धन पाटीलकार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

या स्पर्धेचा (Navdhara) विस्तृत निकाल पुढील प्रमाणे :

कॉम्प्युटर विभाग : प्रथम क्रमांक :- ताडोमल शहाणी इंजिनियर कॉलेजमुंबईबांद्राद्वितीय क्रमांक :- पीसीसीओईआररावेतपुणेतृतीय क्रमांक :- अमृतवाही कॉलेज ऑफ इंजीनियरिंग संगमनेर,

इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभाग : प्रथम क्रमांक :- पीसीसीओईआर रावेतपुणेद्वितीय क्रमांक :- डीकेटीईइचलकरंजीतृतीय क्रमांक :- एचएसबीपीवीटी कास्टीअहमदनगर आणि डी. वाय. पाटील कॉलेज ऑफ इंजीनियरिंग. पुणे

Navratri Walk : इंडो अथलेटिक सोसायटीतर्फे नवरात्री वॉक आणि रन चे आयोजन

मेकॅनिकल विभाग :- प्रथम क्रमांक पीसीसीओई आर रावेतपुणे;  द्वितीय क्रमांक :- गव्हर्मेंट कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अवसरीपुणे;  तृतीय क्रमांक :- कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणे;

सिव्हिल विभाग : प्रथम क्रमांक :- सिंहगड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग वडगावपुणेद्वितीय क्रमांक :-  मोझे कॉलेज ऑफ इंजीनियरिंग पुणेतृतीय क्रमांक :- भिवराबाई सावंत कॉलेज ऑफ इंजीनियरिंगवाघोलीपुणे.

यावेळी स्वागत प्रा. तुषार गायकवाडसूत्रसंचालन प्रा. प्रिया ओघे आणि आभार प्रा. मनीषा देशपांडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.