Navi Sagavi : श्री महालक्ष्मी प्राणप्रतिष्ठापनेनिमित्त उत्साही वातावरणात काढली शोभायात्रा

एमपीसी न्यूज – शुभ्र कुर्ता-पायजमा, डोईवर भगवी टोपी आणि उत्साह आणि भक्तिपूर्ण वातावरणात नवी सांगवीत श्री महालक्ष्मी सेवा भावी ट्रस्टच्या वतीने श्री महालक्ष्मी प्राणप्रतिष्ठानिमित्त शोभायात्रा काढण्यात आली. ढोल, ताशांचा दणदणाट….संबळ, सनई पारंपरिक वाद्याचा सुमधूर आवाज…भक्तांकडून पारंपरिक वेशभूषा परिधान करून लेझिम, झांज व ढोल पथकाचे बहारदार प्रदर्शन…भव्य शोभायात्रा पाहण्यासाठी अबालवृद्धांची झालेली गर्दी, अशा उत्साही वातावरणात शानदार मिरवणूक काढून श्री महालक्ष्मी देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.

नवी सांगवीतील श्री महालक्ष्मी सेवा भावी ट्रस्टच्या वतीने 12 ते 15 फेब्रुवारी या कालावधीत श्री महालक्ष्मी प्राणप्रतिष्ठा सोहळा, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठा शोभायात्रेचा शुभारंभ उदयोजक विजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, स्थायी समितीच्या अध्यक्षा ममता गायकवाड, नगरसेविका शारदा सोनवणे, नगरसेवक अंबरनाथ कांबळे, माधवी राजापुरे, सीमा चौगुले आदी उपस्थित होते.

  • पारंपरिक वाद्याने या मिरवणुकीची रंगत वाढवली. या मिरवणुकीत ढोल-ताशाच्या गजराने परिसर दणाणून सोडला. सर्व वातावरण धार्मिक झाले होते. त्याता लेझिम, सनई चौघडा, कोल्हापूरचे साहसी पथक, पारंपरिक वेशभूषेबरोबर ऐतिहासिक वेशभूषाही मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले.

या मिरवणुकीचे वैशिष्ट्ये म्हणजे संबळ, हलगी पथक आदी सर्व धर्मीय जाती पंथाच्या लोकांनी या मिरवणुकीत सहभाग घेतला. तसेच गारगोटीचे धनगरी गजा नृत्य, कोल्हापूरचे साहसी व दांडपट्टा पथक, पारंपारिक वेशभूषेबरोबर एतिहासिक वेशभूषांनी ही शोभायात्रा अधिकच उत्साही झाली. ही शोभायात्रा यशस्वी करण्यासाठी उध्दव पटेल, सखाराम रेडेकर, सुरेश तावरे, राजेंद्र राजापुरे, दत्तात्रय चौगुले, अशोक दुर्गुळे, सत्यनारायण राठी, डॉ. भास्कर कोळपकर, श्रीकांत चौगुले, नरसिंह पाटील, हनुमंत पाटील, अड. बंडोपंत चौगुले, अरुण गळतगे, विश्वेश्वर धुरुपे, बाबुराव काळे, भीमाशंकर टोंगळे, ईश्वर मोरे, अड. राजाभाऊ सूर्यवंशी, वसंत माळी, विजयकुमार मेनकुदळे, गणेश पाटकर आदींनी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.