Navi Sangvi : दिवाळीनिमित्त समतानगर व समर्थनगरमध्ये स्वच्छता अभियान

एमपीसी न्यूज- नवी सांगवी येथे समतानगर व समर्थनगगर मध्ये दोन वेगवेगळे गट तयार करून मानवी हक्क संरक्षण आणि जागृतीच्या वतीने स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

लक्ष्मीपूजनाच्या रात्री नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करून लक्ष्मीपूजन उत्साहात साजरे केले. सर्व उपनगरातील सर्व रस्त्यांवर फटाक्यांच्या कागदांचा कचरा झालेला दिसून येत होता. तर अतिउत्साही नागरिकांनी खूपच फटाके वाजवल्यामुळे त्यांच्या दारासमोर रस्ताही दिसत नव्हता.

आपण आपला आनंद द्विगुणीत करत आसताना आपण पर्यावरण किती प्रदूषित करत आहोत, याची आपणाला कल्पना ही येत नाही, आपल्यामुळे जेष्ठ नागरिकांना, गरोदर महिलांना, लहान मुले, आजारी व्यक्तींना, पशुपक्ष्यांना किती त्रास होत असेल याचा विचार करवत नाही. शिवाय महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या कामगारांनाही खूप त्रास सहन करावा लागतो. त्यांच्यावरील थोडा ताण कमी व्हावा व आपला परीसर स्वच्छ रहावा म्हणून आम्ही स्वच्छता मोहीम हाती घेतल्याचे शहराध्यक्ष आण्णा जोगदंड यांनी सांगितले.

यावेळी शहराध्यक्ष आण्णा जोगदंड, सहकार्याध्यक्ष गजानन धाराशिवकर, पश्चिम महाराष्ट्र महिला अध्यक्षा संगीता जोगदंड, अनुराधा मांगले, सानिका गायकवाड, आशा गायकवाड, संकेत गायकवाड, रोहन हंचाटे, हनुमंत पंडित तसेच परिसरातील नागरिकांनीही सहभाग नोंदवला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.