Navlakh Umbre News : नवलाख उंबरे येथे ट्रक दुचाकीच्या अपघातात दोघांचा मृत्यू

एमपीसी न्यूज  – रस्त्याच्या बाजूला पार्क (Navlakh Umbre News) केलेल्या ट्रकला दुचाकीची धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी (दि. 15) नवलाख उंबरे मिंडेवाडी येथे घडली.

दत्ता गंगाराम खरात (वय 33), लहू भरत बगाड (वय 22  दोघे रा. राशिर देता, ता. मावळ) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी रमेश कोंडीबा खरात (वय 25 , रा. राशिर देता, ता. मावळ) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुकुटकुमार साधुसरन शर्मा (वय 40, रा. पश्चिम बंगाल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Bhosari News : जाब विचारल्याने दोघांवर सत्तुरने वार

 

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दत्ता आणि लहू हे त्यांच्या दुचाकीवरून नवलाख उंब्रे ते शिंदे वासुली  एमआयडीसी रोडने जात होते. मिंडेवाडी येथे रस्त्याच्या बाजूला शर्मा याने त्याच्या ताब्यातील ट्रक पार्क केला होता. त्या ट्रकला पाठीमागून दुचाकी धडकली. त्यात दत्ता आणि लहू हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी शर्मा याला अटक केली आहे. तळेगाव एमआयडीसी पोलीस (Navlakh Umbre News) तपास करीत आहेत.

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.