Navratra Festival: नवरात्र महोत्सवानिमित्त स्पर्धा आणि बक्षिसांची लयलूट

एमपीसी न्यूज – तुम्हाला नऊवारी साडी परफेक्ट नेसता येते, उत्तम पत्रलेखन करता किंवा उत्तम परिचारिका आहात तर तुमच्यासाठी पैस रंगमंच थियटर वर्कशॉप आयोजित जेरियाट्रीक वेलनेस फाऊंडेशन यांच्या सहकार्याने नवरात्रौत्सवात (Navratra Festival) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धा 27 ते 3 ऑक्टोबर दरम्यान होणार आहेत.

यास्पर्धा चिंचवड येथील पैस रंगमंच येथे सकाळी दहा ते पाच या कालावधीत पार पडणार असून पहिली फेरी 27 सप्टेंबर रोजी तर अंतिम फेरी ही 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

यामध्ये नऊवारी (पेहराव) स्पर्धा (Navratra Festival) होणार असून लहान वयोगट 5 ते 15 तर खुला गट हा 15 वर्षापुढील असा असणार आहे. या स्पर्धेसाठी 200 रुपये प्रवेश फीस आकारली जाणार आहे.या स्पर्धेची पहिली फेरी 30 सप्टेंबर रोजी तर अंतिम फेरी 4 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

http://Chinchwad : चिंचवडच्या भाजी मंडईतून ज्येष्ठ नागरिकांचे दोन आयफोन चोरीला

पत्रलेखन स्पर्धा

दुसरी स्पर्धा आहे पत्रलेखन स्पर्धा याला वयोमर्यादा नाही ती सर्वांसाठी खुली आहे. यात विषयाचे बंधन नाही आंतरदेशीय पत्र किंवा पोस्ट कार्डवर लेखन केलेले असावे. यास्पर्धेत उत्तम मजकुर आणि सुव्वाच्च हस्ताक्षर यावरून विजेता ठरवला जाणार आहे. प्रवेश नोंदणी शुल्क हा 100 रुपये असा आकारला जाणार आहे.

तुम्ही लिहीलेली पत्रे ही 27 ते 30 सप्टेंबर या कालावधीत सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या कालावधीत व्हॉटसअपवर स्कॅन करून किंवा प्रत्यक्ष पैस रंगमंच, थिएटर वर्कशॉप कंपनी, प्रिमीयर प्लाझा (2)3रा मजला, हस्तकला दालनाच्यावर, पुणे-मुंबई रस्ता, चिंचवड, पुणे या पत्त्यावर पाठवावीत.

उत्तम परिचारिका सन्मान

तिसरी स्पर्धा (Navratra Festival) ही आगळीवेगळी असून  यामध्ये रुग्णांची शुश्रूषा मध्ये अग्रगण्य असणाऱ्या पण दुर्लक्षित राहिलेल्या परिचारिकांच्या गुणांना पारखून उत्तम परिचारिकेस सन्मानित करण्यात येणार आहे. या स्पर्धेतील पहिली फेरी 27 सप्टेंबर व अंतिम फेरी 3 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

परिचारिकांना त्यांच्या कामाबद्दल प्रोत्साहीत करण्यासाठी ही स्पर्धा आयोजीत केली आहे. यामध्ये ज्या परिचारीका सहभागी होऊ इच्छितात त्यांना 200 रुपये प्रवेश शुल्क भरून स्पर्धेत भाग घेता येणार आहे.

वरील तीन स्पर्धांबरोबरच खेळ, रॅम्प वॉक, फोटो शूट, डान्स आणि बरंच काही या कार्यक्रमात असणार आहे. या स्पर्धा नियोजीतरित्या पार पडाव्यात यासाठी माजी उपमहापौर शैलजा मोरे, सामाजिक कार्यकर्ते सलीम शिकलगार व अरुण थोरात यांचे सहकार्य लाभणार आहे.

मीडिया पार्टनर म्हणून एमपीसी न्यूज काम पहाणार आहेत. याशिवाय काही अधिक माहितीसाठी इच्छुकांना 9975404026 किंवा 9657286964 या क्रमांकावर संपर्क साधता येणार आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.