Navratra : नवरात्र उत्सवानिमित्त कै. नंदा भोजने प्रतिष्ठानतर्फे वृद्ध आनंद आश्रमात साड्या वाटप

एमपीसी न्यूज – शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त (Navratra) कै. नंदा ज्ञानदेव भोजने प्रतिष्ठानतर्फे लोक सहभागातून वाल्हेकरवाडी येथील मोनीबाबा वृद्ध आनंद आश्रमातील महिलांना साड्यांचे वाटप करण्यात आले.

भोजने प्रतिष्ठानतर्फे व्हॉट्स अॅपद्वारे नागरिकांना नवदुर्गा साडी अर्पण महोत्सव 2022 नवीन किंवा जुन्या साड्या द्या असे अहवान केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. मिळालेल्या प्रतिसादाने भोजने कुटुंब भारावून गेले. नागरिकांनी अक्षरश: नवीन भारीच्या साड्या आणून दिल्या. नवीन जुन्या मिळून 75 साड्या जमा झाल्या.

Pratap Mitra Mandal : नवरात्र उत्सवानिमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांना महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद

प्रभा दुर्गे यांनी वृद्ध महिलांसोबत गाणे गायले, नृत्य (Navratra) केले. यावेळी रेणुका भोजने, धनश्री डिंबळे, शुभांगी मदने, प्रभा दुर्गे, कमलजीत सिंग, दिपक भोजने, शिवाजी अवारे, गणेश भोजने, राहुल मदने आदी उपस्थित होते. साड्या देवून सहकार्य केलेल्या दानशूरांचे, मोनीबाबा अश्रामातील कर्मचाऱ्यांचे मनापासून रेणुका भोजने, दिपक भोजने यांनी आभार मानले. भोजने कुटुंब नेहमीच विविध उपक्रम राबवत असते.

कोरोना काळात धान्य, मास्क वाटप, मुलांच्या वाढदिवसानिमित्त वसतीगृहात धान्य वाटप, रक्तदान शिबिर, शासकीय योजना व इतर कार्यक्रम आयोजन केले जातात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.