Navratri Walk : इंडो अथलेटिक सोसायटीतर्फे नवरात्री वॉक आणि रन चे आयोजन

एमपीसी न्यूज – शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त इंडो ऍथलेटिक सोसायटीतर्फे शनिवारी (दि.1) नवरात्री वॉक (Navratri Walk) आणि रन आयोजन करण्यात आले होते. यामध्ये तब्बल 300 धावपटूंनी सहभाग घेतला होता. रावेत ते चतुःशृंगी देवीच्या मंदिर असा 21 किलोमीटरचे अंतर यावेळी धावपटूंनी पार केले.

रावेत पूल येथे रात्री आठ वाजता महावीर अन्नदान सेवा ट्रस्टचे अध्यक्ष दर्शन लुंकड यांचा हस्ते झेंडा दाखवून (Navratri Walk) सुरुवात करण्यात आली. नऊ दिवस पुणे व आसपास परिसरातील वेगवेगळ्या देवींच्या मंदिरामध्ये सायकल फेरी आयोजित करण्यात आली होती जवळपास शंभरहून अधिक सायकलिस्ट सहभाग घेत होते.

मागील सात दिवसांमध्ये चतुःशृंगी , तांबडी जोगेश्वरी, माण येथील माणदेवी, सारसबाग येथील महालक्ष्मी देवी, बाणेर तुकाई देवी व पुढे कार्ल्याची एकविरा, आकुर्डी येथील तुळजाभवानी व दुर्गा टेकडी येथील दुर्गा देवीच्या दर्शनाची सायकल राईड आयोजित केली आहे. सदर सर्व राईडचे नेतृत्व अविनाश चौगुले व रमेश माने यांनी केले, अशी माहिती सदस्य गजानन खैरे यांनी दिली.

सर्व स्पर्धकांना अल्पोपहाराचे आयोजन महावीर अन्नदान सेवा ट्रस्टचे अध्यक्ष दर्शन लुंकड व सहकारी यांच्यातर्फे करण्यात आले.

Kanpur Accident: कानपूरजवळ भीषण अपघातात 25 भाविक मृत्युमुखी

या नवरात्री उत्सव नियोजन समितीमध्ये अजित पाटील, गणेश भुजबळ,अमृता पाटील, अंकिता चौगुले, सोनल वामन, डॉ.अजय शर्मा, प्रशांत तायडे,संदीप लोहकर, सुधाकर टिळेकर, कैलास शेठ तापकीर, गिरीराज उमरीकर,  चंद्रकांत पाटील, अजित गोरे, संदीप परदेशी, आनंदा पाटील व इतर सदस्यांचा सहभाग होता.

MPC News Quiz 7 : ‘देवीचा जागर’ प्रश्नमंजुषा – भगवती ज्वेलर्सच्या वतीने बक्षिसांचा डबल धमाका! जिंका तब्बल चांदीचे 18 करंडे

तर सदर राईडसाठी अण्णारे बिरादार, डॉ. सुहास माटे, सीए के. एल. बंसल, सुभाष जयसिंघानी, नरेंद्र साळुंखे, पोलीस अधिकारी अजय दरेकर यांनी शुभेच्छा दिल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.