Navratri Utsav loudspeaker : नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबरलाही रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट

एमपीसी न्यूज : यंदाच्या नवरात्रोत्सवात 1 ऑक्टोबर या दिवशीही उत्सवासाठी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात येत आहे.(Navratri Utsav loudspeaker) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चर्चेनंतर हा निर्णय घेतला आहे.

पर्यावरण व वातवरणीय बदल विभागाच्या ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) सुधारित नियम, 2017 अन्वये वर्षामध्ये एकूण 15 दिवस निश्चित करुन सकाळी 6 वाजल्यापासून ते रात्री 12 वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट जाहीर करण्यासाठी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. सर्वसाधारणपणे संबंधित जिल्हाधिकारी यांचेकडून 13 दिवस निश्चित करण्यात येतात. तसेच, 2 दिवस हे जिल्ह्यातील स्थानिक परिस्थितीनुसार सूट देण्यासाठी राखीव ठेवण्यात येतात.

Civet cat rescue : हिंजवडी फेज 3 मधील कंपनीतून एका उदमांजराला केले रेस्कयू 

यावर्षी नवरात्रोत्सव उत्साहात साजरा करता यावा यासाठी 1 ऑक्टोबर, 2022 रोजी नवरात्रोत्सवासाठी सकाळी सहा ते रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक व ध्वनीवर्धक वापरास सूट देण्यात आली आहे.(Navratri Utsav loudspeaker) त्यामुळे मुंबईमध्ये यंदाच्या नवरात्रोत्सवासाठी सोमवार, 3 ऑक्टोबर आणि मंगळवार, 4 ऑक्टोबर या व्यतिरिक्त शनिवार, 1 ऑक्टोबर हा आणखी एक वाढीव दिवस उपलब्ध होणार आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.