Lonavala : नौदलात विद्यार्थ्यांना करियरच्या विविध संधी – श्रीवास्तव

एमपीसी न्यूज – भारतीय नौदलामध्ये विद्यार्थ्यांना करियरच्या अनेक संधी उपलब्ध असल्याचे मत आयएनएस शिवाजीचे कमांडर शाश्वत श्रीवास्तव यांनी व्यक्त केले. शिक्षक व अभियंता दिनाच्या निमित्त सिंहगड महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी संकुल प्रमुख डाॅ. माणिक गायकवाड, प्राचार्य डॉ. मिलिंद रोहोकले, महाविद्यालयाच्या सर्व विभागातील विभाग प्रमुख, एन. एस. एस. कार्यक्रम अधिकारी, ग्रंथपाल तसेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते.

कमांडर श्रीवास्तव यांनी शिक्षक व अभियंता दिनाचे महत्व विशद करत नौदलामध्ये सैनिकांप्रमाणे अभियंत्याला देखिल फार महत्व असल्याचे सांगितले. युद्धनौका महिनोमहिने समुद्रात असतात, त्यावेळी अभियंता फार महत्वाची भूमिका बजावत असल्याचे सांगत नौदलातील करियरच्या संधी विषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. प्राचार्य डॉ. मिलिंद रोहोकले यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत हे झाडाचे रोपटे देऊन केले. महाविद्यलयाच्या शिक्षिका प्रा. प्रियांका हाळे यांना यावेळी उत्कृष्ट शिक्षिका पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

याकार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गणेश खांडेकर यांनी केले तर गणेश कदम यांनी सर्वांचे आभार मानले. या कार्यक्रमासाठी विभाग प्रमुख प्रा. नामदेव गावडे, प्रा. राजेश्वरी थाडी, प्रा. प्रशांत चौगुले, प्रा. सत्येंद्र कोठारी, ग्रंथपाल संग्राम दहीकांबळे, प्रा. संजय माळी, एन.एस.एस. चे विद्यार्थी आणि विद्यार्थी परिषदेचे विद्यार्थी यांनी मोलाचे योगदान दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.