Mumbai News : क्रूझवरील रेव्ह पार्टी प्रकरणी शाहरुख खानच्या मुलाची NCB कडून चौकशी 

एमपीसी न्यूज – अमली पदार्थ विरोधी पथकाने (NCB) शनिवारी मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले. मुंबईच्या समुद्रात क्रूझवर सुरु असलेल्या एका रेव्ह पार्टीमध्ये दहा जणांना ताब्यात घेतले आहे. त्यापैकी एक बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा मुलगा असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात त्याची NCB कडून चौकशी केली जात आहे. 

इंडिया टुडेच्या वृत्तानुसार, मुंबई किनारपट्टीवर शनिवारी रात्री झालेल्या रेव्ह पार्टीच्या संदर्भात एनसीबी आर्यन खानची चौकशी करत आहे. एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे म्हणाले की, आर्यन खानवर कोणत्याही आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही किंवा त्याला आतापर्यंत अटकही करण्यात आलेली नाही. याप्रकरणी एनसीबीने क्रूझ पार्टीची आयोजन केलेल्या सहा आयोजकांनाही बोलावले आहे. एनसीबीने आर्यन खानचा फोन जप्त केला असून अधिकाऱ्यांकडून त्याची तपासणी केली जात आहे.

 

अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला क्रूझ जहाजावर आयोजित केलेल्या पार्टीत गेस्ट म्हणून आमंत्रित करण्यात आलेलं होतं. त्यासाठी त्याला कोणतंही शुल्क आकारण्यात आलेलं नव्हतं. पार्टी आयोजित करणाऱ्यांनी आर्यन खान येणार असल्याचं सांगून इतरांना निमंत्रित केलं होतं अशी माहिती समोर आली आहे.

सात तासांच्या छाप्यादरम्यान एनसीबीच्या अधिकाऱ्यांना चार प्रकारचे ड्रग्स सापडली आहेत. यामध्ये एमडीएमए, मेफेड्रोन, कोकेन आणि चरस यांचा समावेश आहे. तपास अजूनही सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.