Lonavala News : लोणावळा पोस्ट कार्यालयातून एनसीबी पथकाने जप्त केले गांजाचे पार्सल

0

एमपीसी न्युज : पोस्ट पार्सलच्या माध्यमातून लोणावळा पोस्ट कार्यालयात आलेला गांजा एनसीबी (नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो) मुंबईच्या टिमने कारवाई करत ताब्यात घेतला. शनिवारी ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी श्रीमय परेश शहा (वय 26, रा. अहमदाबाद गुजरात), ओमकार जयप्रकाश तुपे (वय 28, रा. नेरुळ, नवी मुंबई) यांना अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोस्ट पार्सलच्या माध्यमातून लोणावळा पोस्ट कार्यालयात गांजाचे पार्सल येणार असल्याचे खबर एनसीबी टिमला मिळाल्यानंतर या टिमने लोणावळा पोस्ट कार्यालयात पाहणी करत पार्सलमध्ये आलेला 1036 ग्रॅम वजनाचा गांजा ताब्यात घेण्यात आला तर तपासात आजून 74 ग्रॅम गांजा ताब्यात घेण्यात आला आहे.

कॅनडा मार्गे हा गांजा मुंबई, गुजरात, अहमदाबाद भागात येत असल्याची माहिती एनसीबीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात दिली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात यांची किंमत 50 ते 55 लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. हा गांजा लोणावळ्यात कसा व कोणाच्या पत्त्यावर आला, यामागे काही रॅकेट आहे का याचा तपास सध्या सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.