Pune : अखेर राष्ट्रवादीचे उमेदवार जाहीर

हडपसरमधून शहराध्यक्ष चेतन तुपे, खडकवासला - नगरसेवक सचिन दोडके, वडगावशेरीत सुनील टिंगरे,  तर, पर्वती मतदारसंघातून नगरसेविका अश्विनी कदम यांना  उमेदवारी

एमपीसी न्यूज – होणार होणार म्हणून अखेर राष्ट्रवादीने बुधवारी रात्री उमेदवार जाहीर केले. बारामती मतदारसंघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, आंबेगाव मतदारसंघात दिलीप वळसे पाटील, हडपसर मतदारसंघातून शहराध्यक्ष चेतन तुपे, खडकवासला मतदारसंघात नगरसेवक सचिन दोडके, पर्वती मतदारसंघात नगरसेविका अश्विनी कदम, वडगावशेरी मतदारसंघात नगरसेवक सुनील टिंगरे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. वडगावशेरी मतदारसंघात माजी आमदार बापूसाहेब पठारे प्रबळ इच्छुक होते. राष्ट्रवादीने धक्कातंत्राचा वापर करीत पठारे यांना झटका दिला.

 

_MPC_DIR_MPU_II

तर पुणे ग्रामीण भागातून जुन्नर – अतुल बेनके, आंबेगाव – दिलीप वळसे पाटील, शिरूर-अशोक पवार, दौंड-रमेश थोरात, इंदापूर – दत्तात्रय भरणे, बारामती – अजित पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. एकूण 77 जागांसाठी उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. या यादीत पिंपरी-चिंचवडमधील एकाही जागेवरील उमेदवारांची अद्याप माहिती देण्यात आलेली नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.