Pimpri-chinchwad : प्रमोदिनी सुहास लांडगे यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पिंपरी चिंचवड (जिल्हा) सचिव पदी निवड

एमपीसी न्यूज – प्रमोदिनी सुहास लांडगे यांची राष्ट्रवादी शरदचंद्र पवार  पक्षाच्या पिंपरी चिंचवड (जिल्हा) सचिव पदी निवड झाली आहे. प्रमोदिनी लांडगे ह्या उच्चशिक्षित      असून त्यांना सामाजिक कार्याचा (Pimpri-chinchwad) दांडगा अनुभव आहे.

प्रमोदिनी लांडगे यांना राजकीय आणि सामाजिक क्षेत्राचा (Pimpri-chinchwad) अनुभव असल्यामुळे त्यांना ही महत्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली आहे. या अगोदर  त्यांनी  अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बाल हक्क समिती, महिला आयोग, पोलीस दक्षता समिती, समाजबंध अशा कित्येक संगठनासाठी जीव झोकून कार्य केलेले आहे.

Chikhali : प्रज्ञानबोधिनी इंग्लिश मीडियम शाळेत मातृ मंदिर वर्धापन दिन उत्साहात साजरा

याविषयी  अधिक बोलताना प्रमोदिनी लांडगे म्हणाल्या की,  राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे विचार  तळागाळातील लोकांपर्यंत (Pimpri-chinchwad) पोहचवणे हीच माझी आद्य जबाबदारी आहे. आजच्या काळात राजकीय अस्थिरतेमुळे  लोकांचा विश्वास लोकशाही व्यवस्थेवर  राहिलेला नाही. सध्याचे राजकीय नेते,पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचे तत्व आणि निष्ठा सोयीनुसार बदलताना दिसत आहे त्यामुळे  आपल्या देशाची  लोकशाही आणि संविधान वाचवण्यासाठी मी शरद पवारांचे विचार समाजातील सर्व घटकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार केलेला आहे.

यावेळी अध्यक्ष तुषार कामठे,सरचिटणीस जयंत शिंदे, वरिष्ठ उपाध्यक्ष काशिनाथ जगताप, ओबीसी सेल शहर अध्यक्ष विशाल जाधव, ग्राहक संरक्षण समितीचे शहर अध्यक्ष संजय पडवळ, शोभा साठे आणि सुप्रिया पवार हे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.