Pimpri News : शरद पवार यांचा वाढदिवस शहरात विविध कार्यक्रमांनी साजरा

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा 81 वा वाढदिवस राष्ट्रवादीच्या वतीने विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात आला.

नाना काटे सोशल फाऊंडेशन व जीवन ज्योती हॉस्पिटल यांच्या विद्यमाने पिंपळे सौदागर येथे आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचे नाना काटे सोशल फाऊंडेशनचे ज्येष्ठ नागरिक विलास काटे, उत्तम धनवटे, अर्जुन काटे, तानाजी काटे, पोपट जगताप ,जगन्नाथ काटे यांच्या हस्ते दीप प्रज्वलित करून उदघाटन करण्यात आले.

या शिबिरामध्ये नागरिकांना तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व योग्य उपचार, नाडी तपासणी, शरीराचे तापमान तपासणी, BMI, तपासणी, मधुमेह तपासणी, हिमोग्लोबिन चाचणी, रक्तदाब, BSL, ECG तपासणी इत्यादी तपासणी करण्यात आली. शिबिराचा लाभ घेणाऱ्या नागरिकांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांच्या हस्ते पुढील वैद्यकीय उपचारासाठी नाना काटे सोशल फाऊंडेशन तर्फे डिस्काऊट कार्डचे वाटप करण्यात आले. यावेळी जीवन ज्योती हॉस्पिटलचे डॉ.अतुल दायमा, डॅा. चद्रंशेखर अन्नदाते,डॅा.राजेंद्र साठे, डॅा. सस्मित जैस्वाल उपस्थित होते

चिंचवड येथील लोकमान्य होमिओपॅथिक कॉलेज व हॉस्पिटल यांच्या वतीने चिंचवड स्टेशन येथील इंदिरानगर येथे मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 100 नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

या शिबीरामध्ये डॉ. पाचपुते (अस्थिरोग तज्ञ), डॉ. सौ. बिजल जैन (स्त्रीरोग तज्ञ), डॉ. अमृता आंबेकर (कान, नाक, घसा तज्ञ), आणि होमिओपॅथिक तज्ञ यांनी रोगांवर मार्गदर्शन केले. तसेच नागरिकांची तपसणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आले. हे शिबिर निहाल पानसरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि कॉलेजच्या प्राचार्या डॉ. सौ. नंदिनी जोशी, डॉ. जयेश क्षीरसागर, आणि लोकमान्य होमिओपॅथिक कर्मचारी यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले होते.

लहान मुलांना अन्नदान –

चिंचवड येथील निचिकेत बालग्राम अनाथ आश्रम मधील लहान मुलांच्या लहान मुलांना अन्नदान करण्यात आले. या मुलांच्या हस्ते केक कापला. राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी सोशल मीडिया बारामतीचे शहराध्यक्ष तुषार लोखंडे, राष्ट्रवादी युवक कॉग्रेसचे पिंपरी-चिंचवड शहर संघटक तेजस चिकणे, मयूर चिलेकर, तुषार सावंत, मयूर शितोळे, अनिकेत पवार, दुर्गेश सुर्वे, चेतन कांजवणे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.