Pimpri News : राज्य सरकारने सीएनजीचे दर कमी केल्याने राष्ट्रवादीकडून रिक्षाचालकांचे अभिनंदन तर पेट्रोल दरवाढीच्या निषेधार्थ भाजपचा केला निषेध

राज्य सरकारकडून दिलासा तर केंद्र सरकारकडून महागाईचा भडीमार

एमपीसी न्यूज – उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणे राज्यातील ‘सीएनजी’, ‘पीएनजी’सारख्या नैसर्गिक गॅसवरील मूल्यवर्धित कराचा (‘व्हॅट’) दर आज 1 एप्रिल 2022 पासून कमी झाला. सीएनजी प्रतिकिलो 6 रुपयांनी स्वस्त झाला. त्यामुळे रिक्षाचालक, कारचालकांना, घरगुती सीनजी ग्राहकांना मोठा दिलासा राज्यातील महाविकास आघाडी सरकारने दिल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने रिक्षाचालकांचे गुलाबपुष्प देऊन अभिनंदन केले. तर, घरगुती एलपीजी गॅस सिलिंडर, दररोज पेट्रोल, डिझेलच्या दर वाढविणा-या केंद्र सरकारचा निषेध केला. केंद्र सरकारच्या खोट्या आश्वासनांचा केक कापून वाढदिवस साजरा केला.

एम्पायर इस्टेटच्या अलीकडील पिंपळे पंपावर राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. कार्याध्यक्ष नीलेश निकाळजे, विधानसभा अध्यक्ष आयुष निंबाळकर, वेदांत माळी, ओम शिरसागर, उपाध्यक्ष अमोल रावळकर, उपाध्यक्ष दिनेश पटेल, आबा गवळी, तुषार सोनवणे, पियुष अंकुश,सतीश परब,प्रशांत कळेल, पंकज बगाडे आदी सहभागी झाले होते.

शहराध्यक्ष अजित गव्हाणे म्हणाले, ”राज्यातील महाविकास आघाडी सरकारने सीएनजी सहा रुपयांनी कमी केला. रिक्षाचालक, कारचालकांना मोठा दिलासा. तर, दुसरीकडे केंद्रातील भाजप सरकार पेट्रोल, डिझलेच दर दररोज वाढवत आहे. घरगुती गॅस सिलेंडरचेही दर वाढविले. या महागाईमुळे सर्वसामान्य नागरिकांचे कंबरडे मोडले आहे. केंद्र सरकारकडून होत असलेल्या पेट्रोल दरवाढीविरोधात नागरिकांना आवाज उठविला पाहिजे. केवळ भावनेचे राजकारण करुन चालणार नाही. नागरिकांना पोट महत्वाचे आहे. त्यामुळे पेट्रोलच्या दरवाढीविरोधात नागरिकांनी रस्त्यावर उतरुन केंद्र सरकारचा निषेध केला पाहिजे”.

इम्रान शेख म्हणाले, “राज्यातील महाविकास आघाडी सरकारने आजपासून सीएनजीचे दर कमी केले. 6 रुपयांनी सीएनजीचे दर कमी झाले. परिसरात सीएनजी 62 रुपये प्रति किलो दराने मिळत आहे. कोरोना महामारीमुळे मेटाकुटीला आलेल्या जनतेला राज्य सरकार  दिलासा देत आहे. सीएनजीचे दर कमी झाल्याने रिक्षाचालक, कारचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. हातावर पोट असलेल्या रिक्षाचालकांनी सीएनजीचे दर कमी केल्याबाबत राज्य शासनाचे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आभार मानले. रिक्षाचालक, कारचालकांचे  अभिनंदन केले”.

”राज्य सरकार नागरिकांना दिलासा देत असताना दुसरीकडे केंद्र सरकार महागाईचा भडीमार करत आहे. पाच राज्यातील निवडणुका पार पडताच घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात वाढ केली. पेट्रोल, डिझेलचे दर दररोज वाढत आहेत.  भाजपने 2014 मध्ये 40 रुपयांप्रमाणे पेट्रोल देऊ असे सांगितले. पण, दर कमी काही केले नाहीत. त्याउलट प्रचंड दर वाढविले. आज 117 रुपये प्रतिलीटर पेट्रोल झाले आहे. या महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यामुळे वाढती महागाई, बेरोजगारी, खोटे जुमले या केंद्रातील भाजप सरकारच्या आश्वासनांचा केक कापून वाढदिवस साजरा केल्याचे शेख यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.