Pune: महामेट्रो म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण : दीपक मानकर यांचा हल्लाबोल

एमपीसी न्यूज – महामेट्रो म्हणजे भ्रष्टाचाराचे कुरण असून, सब कॉन्ट्रॅक्टर मार्फत मेट्रोच्या केलेल्या कामाची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादीचे जेष्ठ नगरसेवक दीपक मानकर यांनी केली. मेट्रो प्रकल्पाची चौकशी व्हावी, यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनाही निवेदन देणार असल्याचे मानकर म्हणाले. 
मेट्रोच्या कामामुळे सर्वसामान्य पुणेकर वैतागले आहेत. तासनतास वाहतूक कोंडीचा सामना कराव लागत आहे. कोठून भाजपची पुणे महापालिके सत्ता दिली, याचा पुणेकरांना पच्छताप होतोय. तसेच, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण देण्याचे काम केले, तो भिडेवाडा तातडीने राष्ट्रीय स्मारक करा. मी आता गॉगल वरून चष्मावर आलोय. आता माझे डोळे बंद व्हायला लावू नका, त्याआधी शिवसृष्टी करा, अशी आग्रही मागणी मानकर यांनी केली. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बैठक घेऊन 15 दिवसात शिवसृष्टी करणार असल्याचे सांगितले होते. त्या बैठकीला महापौर मुरलीधर मोहोळ, सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे उपस्थित होते. त्यांनतर भाजप नगरसेवकांनी विजयाचे फेटे घातले होते. तरीही शिवसृष्टीसाठी लागणाऱ्या चांदनी चौकातील जागेचे संपादन झाले नाही.

आता 26 कोटी शिवसृष्टीसाठी टाकले. छत्रपतीच्या नावाने राजकारण करता, ही जागा ताब्यात का आली नाही, महापौर आपण मावळे आहात, ही शिवसृष्टी करण्याचा संकल्प करा,असे आवाहनही त्यांनी केले. आम्ही किती वेळा शिवसृष्टीची मागणी करायची.
5 ते 6 वर्षानंतर बजेटचीच विक्री करावी लागेल. स्थायी समिती सदस्यांना 12 – 12 कोटी वाटले. त्यातील 2 – 2 कोटी शहरी – गरीब योजनेला द्या. अनेक गोरगरीब वैद्यकीय सोयीसुविधा पासून वंचित आहेत. अटलजींच्या नावाने महाविद्यालय उभारण्यासाठी प्रस्ताव नीट गेला नाही.अहमदाबाद च्या धर्तीवर हॉस्पिटल करायचे आहे, केवळ योजना जाहीर केल्या पण, अंमलबजावणी होत नसल्याचा हल्लाबोल दीपक मानकर यांनी भाजपवर केला.
आता महाविकास आघाडीचीच सत्ता येणार
2017 मध्ये पुणेकरांनी भाजपचे 98 नगरसेवक निवडून दिले. त्याचा पुणेकरांना पाश्चाताप होतोय. आता महाविकास आघाडीची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही, असे मानकर म्हणले. शिवसृष्टी ते रामवाडी असा मेट्रो मार्ग असेल असे सांगितले होते पण झाले नाही. गरिबाच्या मुलांना शिक्षण देणे आपली जबाबदारी आहे. 2003 मध्ये  महापालिकेच्या शाळांत सव्वा लाख विद्यार्थी होते. आता केवळ 65 हजार विद्यार्थी आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा फोटो टाकल्या बद्दल महापौर मुरलीधर मोहोळ यांना धन्यवाद देण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.