NCP : निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढणार? रोहित पवार म्हणाले….

एमपीसी न्यूज – जामखेड-कर्जतमधील लोकांचे (NCP ) माझ्यावर प्रचंड प्रेम आहे. त्यामुळे या मतदारसंघातील नागरिकांना मी सोडू शकत नाही. आपण लोकसभेची निवडणूक लढविणार नसून जामखेड-कर्जतमधूनच पुन्हा विधानसभेची निवडणूक लढविणार असल्याचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट केले.

रोहित पवार म्हणाले, निवडणूक आयोग भाजपच्या हातचे बाहुले आहे. त्यामुळे आमचे चिन्ह, पक्षनाव काढून घेतले जाईल. पण, आमच्यासोबत शरद पवार साहेब आहेत. त्यामुळे आम्हाला कोणतीही अडचण नाही. आमचे काम जोरात सुरु आहे. पवार साहेब भाजपचे बाप आहेत. भाजप कुटुंब, पार्टी फोडण्यासाठी जबाबदार आहे.

Pune Ganeshotsav : गणरायाच्या आगमन सोहळ्यानिमित्त पुण्यात मंगळवारी वाहतुकीत बदल

भाजपला हरविण्याची ताकद सामान्य व्यक्ती आणि महाविकास आघाडीमध्ये आहे. सत्तेत असलेले लोक स्वार्थी, हिताचे (NCP ) राजकारण करत आहेत. सुप्रिया सुळे यांना पिंपरी-चिंचवड शहरात येण्याची अघोषित बंदी नव्हती. पण, यापुढे त्या शहरात येतील. अजित पवार यांच्या कामामुळे त्यांना आदरयुक्तपणे घाबरतो, असेही ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.