Akurdi News : राष्ट्रवादीतर्फे कष्टक-यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने दत्तवाडी आकुर्डी येथे पक्षाचे सरचिटणीस इखलास सय्यद यांच्या पुढाकारातून कष्टकरी कामगारांचा सन्मान करण्यात आला. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते कष्टक-यांचा सन्मान  करण्यात आला.

राष्ट्रवादी महिला शहराध्यक्षा  कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, माजी नगरसेवक निलेश पांढरकर,विनायक रणसुभे, कामगार सेलचे अध्यक्ष किरण देशमुख, पुष्पा शेळके, कविता खराडे, शकरूला पठाण, साहूल हमीद शेख, अशोक वायकर, मनीषा गटकल, ज्योती गोफने, आशा मराठे, निर्मला माने आदी  उपस्थित होते.

अजित गव्हाणे म्हणाले, ”पिंपरी-चिंचवड शहराचे रूपांतर अण्णासाहेब मगर यांच्या कल्पकतेतुन  औद्योगिकनगरी मध्ये झाले.  येथे उद्योग धंदे वाढविण्याचे कार्य शरद पवार यानी केले. तर, महापालिकेला अजित पवार यानी उंचावर नेत या शहराला नव्याने ओळख करून दिली. वैभव प्राप्त करून दिले. त्यामुळे येथे रोजगार, उद्योग व्यावसाय निर्माण झाला.

औद्योगिकनगरीतील कामगारांवर अन्याय होता कामा नये. जर कुणावर अन्याय होत असेल तर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी संपर्क साधावा. त्यांना न्याय मिळवून देवू,  इखलास सय्यद हे राष्ट्रवादी काँग्रेस जनसंपर्क कार्यालयमार्फत चांगले काम करीत आहेत. त्यांनी कष्टकारी कामगारांच्या सन्मान केला ही बाब उल्लेखनीय आहे. गेले दोन दशके आकुर्डी भागात पक्षाचे काम चांगले सुरु आहे. आता इखलास  सय्यद ते कार्य पुढे नेत आहेत”.

कविता आल्हाट, विनायक रणसुभे, ज्ञानेश्वर ननावरे, आर.जी.जाधव, यशवंत भालेराव यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वसंत सोनार, गंगाधर चौधरी, विश्वनाथ मोरे,चंद्रकांत इंगळे,आण्णा भोसले,गौतम बेंद्रे, अनिल पाटील, शिवाजी मिसाळ, रमेश भोरकर,शाहरुख शेख, सुनील मोरे,भास्कर म्हस्के,जावेद पठाण, जिब्राईल शेख, नम्रता गुरव , ललिता माने , संगीता पारेख यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक इखलास सय्यद यांनी केले. सूत्रसंचालन प्रकाश परदेशी यांनी केले. तर, आभार झाकीर रमजान शेख यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.