Pune News : युवा दिनानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे युवकांचा सन्मान

0

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादी कॉग्रेसच्या पुणे शाखेतर्फे कोथरूड मधील होतकरू युवकांचा युवा दिनानिमित्त सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कोरोना काळात लक्ष्यवेधी कामगिरी व अतोनात कष्ट करून समाजाची सेवा केलेले तरूण डॉक्टर, पोलीस, वैद्यकीय कर्मचारी व पत्रकारांना भेटून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सन्मान चिन्ह, नारळ व शाल देऊन आभार व्यक्त केले.

कोथरूडमधील सुतार दवाखान्यातील कोरोना चाचणी केंद्रात कार्यरत असलेल्या डॉ. सुमित चव्हाण. डॉ. तेजस शहा, कु. काजल कांबळे, जयंत चव्हाण, आकाश म्हेत्रे, ओमकार गुळूमकर, राहुल खुडे तसेच आशिष गार्डनजवळील चव्हाण क्लिनिक येथे रुजू असलेले डॉ. विकास चव्हाण यांचा युवा सन्मानाने गौरव करण्यात आला. तसेच पत्रकारिता क्षेत्रातील समाधान काटे, कोथरूड पोलीस ठाण्यातील युवा पोलीस कर्मी अनिस तांबोळी, संदीप शेळके, नितीन जगदाळे, अमीर पटेल, महेंद्र उईके यांना युवा सन्मानाने पुरस्कृत करण्यात आले.

या कार्यक्रमाचे नियोजन कोथरूड राष्ट्रवादीचे गिरीश गुरूनानी यांनी केले होते. युवा शक्तीचा सन्मान करून त्यांच्या कर्तृत्वाला प्रोत्साहन देण्याच्या हेतू या कार्यक्रमाचा होता.  तसेच कोरोनाशी लढा लढण्यात युवकांचा लक्षणीय वाटा असल्याचे आणि अशा कर्तव्यनिष्ठ युवकांच्या हातात आपल्या देशाचे भविष्य सुरक्षित व उज्वल असेल अशी भावना त्यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली.

प्रसंगी स्वप्नील दुधाने (राष्ट्रवादी कॉंग्रेस, कोथरूड विधानसभा अध्यक्ष) सनी मानकर (राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय सचिव), प्रवीण धनवे (राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, मुळशी तालुका कार्याध्यक्ष), संकेत शिंदे (राष्ट्रवादी चित्रपटसेनेचे सरचिटणीस), अमोल गायकवाड, रवी गाडे, संदेश कोतकर (राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस, कोथरूड विधानसभेचे उपाध्यक्ष इत्यादी उपस्थित होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.