Ncp : ईडीच्या गैरवापरातून जयंत पाटील यांची चौकशी – काशिनाथ नखाते

एमपीसी न्यूज – ईडी भाजपची घरगडी (Ncp) असल्यासारखे वागत असून विरोधी पक्षांना सरकार घाबरवत आहे. जयंत पाटील हे लोकनेते असून त्यांनी केलेल्या प्रामाणिक कामाच्या बळावर ते निर्दोष सिद्ध होतील, असा विश्वास व्यक्त करत कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी या कारवाईचा निषेध केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नॅशनलिस्ट ट्रेड युनियन, कष्टकरी संघर्ष महासंघातर्फे दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की भाजपचे फोडाफोडीचे राजकारण जनतेला पटलेले नसून कर्नाटकात त्यांनी दाखऊन दिले आहे. काही वर्षापासून केंद्र सरकार मार्फत देशातील विविध राज्यातील विरोधकांवर ईडी, सीबीआय, अशा यंत्रणा मार्फत दबाव टाकला जात असून कारवाईची भिती दाखऊन भाजप पक्ष प्रवेश केल्यास गुन्हे माफ होतात हे अनेकदा स्पष्ट झाले आहे.

Alandi : आळंदी मधील ऐतिहासिक भागीरथी कुंडच दिसेनासे !

जयंत पाटील यांच्या प्रकरणामध्ये काही एक सापडणार नाही. विविध (Ncp) राज्यातील निवडणुकामध्ये मिळत असलेले अपयश झाकण्यासाठी भाजप विरोधकांवर तपास यंत्रणा मार्फत नोटिसा पाठवल्या जात आहेत, या कृतीचा कामगार निषेध व्यक्त करीत असून हे सर्व राज्यातील जनता पाहत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.