NCP: महागाई, बेरोजगारी विरोधात गुरुवारी महिला राष्ट्रवादी काँग्रेसची जनजागर मोहीम

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र संपूर्ण देशात वाढलेली महागाई, तरुणांच्या (NCP) हाताला नसणारे रोजगार, वाढत्या बेरोजगारी विरोधात महिला राष्ट्रवादीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राबविल्या जाणाऱ्या जनजागर यात्रेचे 5 जानेवारी 2023 रोजी पिंपरी- चिंचवड शहरात आगमन होत आहे. यानिमित्ताने जनजागर कोपरा सभेचे आयोजन केले आहे.

राज्य आणि पिंपरी-चिंचवड शहरात भाजपाचा वाढलेला भ्रष्ट्राचार, भाजपा नेत्यांकडून थोर पुरुषांविषयी वारंवार केली जाणारी अपमानजनक वक्तव्य, आधीच बेरोजगारी वाढली असताना महाराष्ट्रातून बाहेर जाणारे उद्योगधंदे, शहरात वाढलेली गुन्हेगारी या ज्वलंत विषयावर जनतेत जागृती करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात राबविल्या जाणाऱ्या जनजागर यात्रा काढण्यात येत आहे.

या जनसागर यात्रेनिमित्ताने डिलक्स चौक, पिंपरी येथे उद्या दुपारी 3 वाजता खंडोबा माळ, आकुर्डी येथे सायंकाळी 4.30 वाजता, गोसावी हॉस्पीटल, रूपीनगर येथे 6 वाजता या ठिकाणी कोपरा सभा आयोजित केली असून शहरातील जनसागर यात्रेची समारोप सभा पी.एम.टी. चौक, भोसरी येथे रात्री 8 वाजता होणार आहे. या जनजागर यात्रेसाठी खास LED रथ तयार केला असून भाषणांसाठी स्वतंत्र रथ नियोजित (NCP) केला आहे.

PCMC : दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांना महापालिकेच्या वतीने श्रद्धांजली

या जनजागरणासाठी खासदार सुप्रिया सुळे, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष विद्या चव्हाण, खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष फौजिया खान, प्रदेश निरीक्षक आशा मिरगे, वैशाली नागवडे, शितल हगवणे यासह शहरातील पक्षाचे वरीष्ठ नेते, माजी महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, विरोधी पक्ष नेते, माजी नगरसेवक – नगरसेविका व सर्व सेलचे पदाधिकारी – कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. अशी माहिती शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे माहिती दिली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.