Pimpri News : राष्ट्रवादीचे आमदार बनसोडे शिंदे गटाच्या मार्गावर? मुख्यमंत्र्यांच्या गाडीतून केला प्रवास

एमपीसी न्यूज – राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार गेल्यापासून पक्षापासून अंतर ठेवून राहणारे राष्ट्रवादीचे पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मार्गावर आहेत का अशी चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरु झाले आहे. (Pimpri News) त्याचे कारणही तसेच आहे. आमदार बनसोडे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेतली आणि दोघांनी एकाच गाडीतून प्रवास केला आहे.

2014 ला झालेल्या निवडणुकीत मोदी लाटेमध्ये अण्णा बनसोडे यांचा पराभव झाला होता. त्यानंतर ते राजकारणात फारसे सक्रिय नव्हते. मात्र, 2019 च्या निवडणुकीत अजित पवार यांनी नगरसेविकेला जाहीर झालेली उमेदवारी रद्द करुन बनसोडे यांना उमेदवारी दिली. दादांच्या पाठिंब्यामुळे ते पुन्हा पिंपरी मतदार संघाचे आमदार झाले.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांचे ते कट्टर समर्थक आहेत. 2019 मध्ये जेव्हा अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. तेव्हा एकमेवर बनसोडे हे शेवटपर्यंत अजित पवार यांच्यासोबत राहिले होते.

Pimpri News : महापालिका शाळांमध्ये संत रविदास महाराज यांची जयंती साजरी करा

पानटपरी चालविणा-या बनसोडे यांना अजित पवार यांनी राजकीय ताकद दिली. त्यामुळे पानटपरी चालविणारे बनसोडे हे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष आणि दोनदा आमदार झाले. बनसोडे यांच्या आजच्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीने ते  शिंदे गटात प्रवेश करतात की काय अशी शहराच्या राजकीय (Pimpri News) वर्तुळात सुरू झाल्या आहेत. अण्णा बनसोडे हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. बनसोडे यांनी जर शिंदे गटात प्रवेश केला तर राष्ट्रवादीसाठी हा मोठा धक्का असणार आहे.

दरम्यान, याबाबत आमदार बनसोडे यांच्याशी संपर्क साधला असता तो होवू शकला नाही.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.