Supriya sule : पदाने मोठे असून चालत नाही दिलदार आणि कर्तत्वान देखील असले पाहिजे – सुप्रिया सुळे

एमपीसी न्यूज : शिवाजी पार्कवर दसरा मेळावा कुणाचा होणार यावरून सध्या शिंदे गट आणि ठाकरे गटात जोरदार चुरस सुरू आहे. या वादात आता राष्ट्रवादी काँग्रेसनेही उडी घेतली असून त्यांनी ठाकरे गटाची बाजू मांडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दसरा मेळाव्यावरून एकनाथ शिंदे यांना टोला लगावला आहे. आम्हाला देखील कधी दसरा मेळाव्याची उत्सुकता लागलेली असायची.(Supriya sule) दसरा मेळाव्याच्या व्यासपीठावरून आमच्यावर देखील टिका होत होती. मात्र दिलदार विरोधक नसतील तर राजकारणाला अर्थ उरत नाही. दसरा मेळाव्यावरून सध्या राजकारणात जे सुरू आहे ते राज्याच्या संस्कृतीला शोभणारे नसल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. अप्रत्यक्षपणे त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला लगावला.

पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार यांच्यासोबत त्यांनी आज बैठक घेतली. बैठकीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पुढे बोलताना त्या म्हणाल्या अजित पवार पालकमंत्री असताना दर आठवड्याला पुण्यातील कामांचा आढावा घेत होते. मात्र आता दुर्दैवाने तीन महिन्यापासून पालकमंत्री नाही, त्यामुळे कामांचा आढावा होत नाहीय.

Chakan news : चाकण नागरी पतसंस्थेस दिपस्तंभ पुरस्कार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन बारामती दौऱ्यावर येणार आहे. त्याविषयी प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या, माझं आयुष्य सगळं पारदर्शक आहे…13 वर्षापासून लोकप्रतिनिधी आहे.(Supriya sule) सोशल मीडियावर माझ्या कामाचा आढावा घेतला तर समजेल, देशातील लोक मला फॉलो करतात. मला आनंद होत आहे की देशाचे अर्थमंत्री बारामतीत येत आहेत,मी त्यांचं स्वागत करते. बारामती लोकसभा मतदार संघात अनेक चांगले गोष्टी, संस्था आहेत त्यांना जर खरच वेळ मिळाला तर त्यांनी भेट द्यावी…

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.