NCP : महिला कुस्तीपटूंच्या अटकेच्या निषेधार्थ  राष्ट्रवादीचे आंदोलन

एमपीसी न्यूज – ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक झालीच (NCP) पाहिजे, खिलाडियों के सन्मान में राष्ट्रवादी मैदान मे, अशा घोषणा देत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने  दिल्लीमध्ये महिला कुस्तीपटूंना झालेल्या मारहाण व अटकेच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले.पिंपरी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन झाले.

युवती अध्यक्षा वर्षा जगताप, संगीता ताम्हाणे, कविता खराडे,  सविता धुमाळ, लता ओव्हाळ,  देवेंद्र तायडे, राजू लोखंडे,   पूनम वाघ,  मनीषा गटकळ,  निर्मला माने, ज्योती तापकीर, संगीता कोकणे,  ज्योती निंबाळकर,   मीरा कदम,  दिपाली देशमुख, ज्योती गोफणे,  उषा उभारे, विजया काटे,  आशा मराठे, सारिका हरगुडे,  मेघा पळशीकर,  शोभा साठे, नीलम कदम, सुप्रिया जाधव, अंकीता साबळे, सपना कदम, किरण शेगोकर,  युवराज पवार,    राजन नायर,  ज्ञानेश्वर कांबळे,  शिरीष साठे, प्रदीप गायकवाड, संपत पाचुंदकर, बिरुदेव मोटे, राजू चांदणे, विकी साठे,  पोपट पडवळ, कोमल भालेकर,रिझवाना शेख, आण्णा पाखरे,  राजेश हरगुडे, रोहित जाधव, संदीप शिंदे, ओम क्षीरसागर, ऋषिकेश शिंदे उपस्थित होते.

Pimple Guruv : सासू व नणंदेच्या टोमण्याला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

महिला शहराध्यक्ष प्रा.कविता आल्हाट म्हणाल्या की, राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार ब्रिजभूषण शरण सिंग यांच्या विरोधात सात कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे गुन्हे दाखल केले आहेत. परंतु, दिल्ली पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्यानंतर कुस्तीपटूंनी गेल्या 23 एप्रिल पासून जंतरमंतर येथे आंदोलन सुरू केले होते. नव्या संसद भवनासमोर महिलांची खाप पंचायत करण्याची घोषणा कुस्तीपटूंनी केल्याने पोलिसांनी कुस्तीपटूंवर कारवाई केली.

यात बजरंग पूनिया,विनेश फोगाट व साक्षी मलिक यांना पोलिसांनी बळाचा वापर करून ताब्यात घेतले. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नवीन संसद भवनाचे उद्घाटन करत असताना दुसरीकडे  भारतीय  महिला कुस्तीपटू आपल्या न्याय हक्कांसाठी आंदोलन करत होते. परंतु, यांना संसद भवनाचे उद्घाटन करण्यातच जास्त रस दिसत होता. हे चित्र अतिशय दुर्दैवी आहे.

खेळाडू जेव्हा देशासाठी पदक जिंकतात तिरंगा अंगा खांद्यावर घेऊन भाऊक होतात ,आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाची मान उंचावतात, तेव्हा  अभिमानाने उर भरून येतो. घडलेले दृश्य मान शर्मने झुकवणारे आणि अंतर्मुख होऊन पहायला लावणारे आहे.

लोकशाही कडून हुकूमशाही कडे  वाटचाल होते की काय असे वाटायला लागले आहे. खेळाडूंच्या आंदोलनानंतर व कालच्या या घटनेनंतर राष्ट्रवादी महिला काँग्रेस पिंपरी चिंचवड शहराच्या वतीने ब्रिजभूषण सिंह यांचा तात्काळ राजीनामा घ्यावा, नाहीतर क्रीडा संघटनेच्या वतीने व शहराच्यावतीने अतिशय तीव्र आंदोलन यापुढे घेण्यात येईल इशारा देण्यात (NCP) आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.