NCP News : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना कोणत्याही क्षणी होऊ शकते अटक; स्वत:च दिली माहिती

एमपीसी न्यूज : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (NCP News) यांना कोणत्याही क्षणी अटक होण्याची मोठी बातमी समोर येत आहे. ही माहिती स्वत: आव्हाड यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे. त्यांना केंद्रातील अधिकाऱ्यानी सांगितले आहे, की तुम्हाला अटक होणार आहे. काय म्हणाले आव्हाड सविस्तर जाणून घेऊ – 

नेहमीच आपल्या विधानांनी चर्चेत असलेले ठाण्याचे राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांना अटक होणार आहे. त्यांनी प्रसार माध्यमांसोबत बोलताना सांगितले, की मला कोणत्याही क्षणी अटक होणार आहे. केंद्रातील अधिकाऱ्यांमार्फत ही माहिती मिळाली आहे. तसेच पुढच्या ठाणे महानगर पालिकेच्या निवडणुकीपर्यंत तुरुंगात ठेवण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतरही काही महीने आतमध्ये ठेवण्याचा कार्यक्रम ठरला असल्याचे अधिकाऱ्यानी आव्हाड यांना सांगितले.

Shivai Bus : मुंबई-पुणे मार्गावर धावणार पर्यावरणपूरक 100 शिवाई बस

आता या प्रकरणी जितेंद्र आव्हाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या (NCP News) भेटीला गेले आहेत. माझ्यावर कोणत्या केस नसल्याने मला आश्चर्य वाटले असे त्यांनी म्हंटले आहे. परंतु, ही अटक ठाण्यातील अभियंता अनंत करमुसे मारहाण प्रकरणात होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जात आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.