Pune Crime News : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांकडून महिला सरपंचाला मारहाण

एमपीसी न्यूज – पुण्यातील लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या हद्दीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्याने एका महिला सरपंचाला मारहाण केली आहे.

त्या संबंधीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून संबंधित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पुणे जिल्ह्यातील लोणी काळभोर परिसरातील कदम वाकवस्ती परिसरात हा प्रकार शुक्रवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास घडला.

गौरी गायकवाड असे मारहाण झालेल्या सरपंच महिलेचे नाव आहे. तर मारहाण करणारा सुजित काळभोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा पदाधिकारी असल्याचे सांगितले जाते. लोणी काळभोर पोलिसांनी त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला ताब्यात घेतले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, महिला सरपंच गौरी गायकवाड आणि सुजित काळभोर यांच्यात काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणावरून भांडण झाले होते. याच भांडणाचा रागातून हा प्रकार घडला. आज सकाळच्या सुमारास गौरी गायकवाड या लोणीकाळभोर परिसरातील एका लसीकरण केंद्रांमध्ये गेल्या होत्या. सुजित गायकवाड याने त्या लसीकरण केंद्रामध्ये प्रवेश करून त्यांना मारहाण केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.