pimpri : राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे सामना वृत्तपत्राची होळी

एमपीसी न्यूज – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिवसेनेवर केलेल्या टिकेला उत्तर देताना शिवसेना प्रमुख उध्दव ठाकरे आणि सामना वृत्तपत्राने केलेल्या टिकेचा तीव्र निषेध करीत सामना वृत्तपत्राची आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी-चिंचवड शहरतर्फे होळी करण्यात आली.

यावेळी शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील, विठ्ठल उर्फ नाना काटे, प्रशांत शितोळे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, अरूण बोऱ्हाडे, फजल शेख, महंम्मद पानसरे,नगरसेविका सुलक्षणा शिलवंत, विजय लोखंडे, आनंदा यादव, वर्षा जगताप, प्रकाश सोमवंशी , गंगा धेंडे, पुष्पा शेळके, मनिषा गटकळ, इम्रान शेख, गोरक्ष लोखंडे, शकुंतला भाट,प्रदीप गायकवाड, शशिकांत चौंडीकर, शिला भोंडवे, संजय लंके, शक्रुल्ला पठाण, अमोल भोईटे, रशीद सय्यद, हमीद शेख, निलेश पुजारी, राजेंद्र पवार, यशवंत शिंदे, बाळासाहेब पिल्लेवार, उत्तम हिरवे, संजय औसरमल, सचिन माने, प्रशांत देवकाते, सविता धुमाळ, मिनाक्षी उंबरकर, वर्षा शेडगे, आशा शिंदे, सविता खराडे, वंदना कांबळे, लालमहंम्मद चौधरी, गोरोबा गुजर, स्वप्न‍िल डोळस, सचिन मोरे, अनिल चव्हाण आदींसह अनेक आजी-माजी नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यावर सामनामधून आज शेलक्या शब्दात टीकास्त्र सोडण्यात आलंय. महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांना काडीमात्र किंमत नाही, केवळ काकांच्या पुण्याईने अजित पवार आजपर्यंत तरले आहेत, अशा शब्दात सामनामधून टीका करण्यात आली आहे. राष्ट्रवादीच्या तंबूचा कळस म्हणजे अजित पवारांची रिकामी खोपडी आहे. या खोपडीस आम्ही म्हणजे शिवसेना किंमत देत नाही. अयोध्येत राम मंदिरास विरोध हेच अजित पवारांचे धोरण आहे. त्यांनी प्रभू श्रीरामाचा आणि बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान केला आहे. अशा शेलक्या शब्दात अजित पवारांनी टीका केली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.